Tarun Bharat

सुपर एक्स्प्रेस युनियन जिमखाना, साई स्पोर्ट्स हुबळी टायगर्स संघ विजयी

बीपीएल मोहन मोरे चषक टी-20 क्रिकेट स्पर्धा

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव

युनियन जिमखाना आयोजित बेळगाव प्रिमियर लीग मोहन मोरे चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत बुधवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात सुपर एक्स्प्रेस युनियन जिमखाना संघाने मोहन मोरे संघाचा अवघ्या 2 धावानी तर साई स्पोर्ट्स हुबळी टायगर्स संघाने अर्जुनवीर श्री साई सोशल संघाचा 5 गडय़ांनी पराभव करून प्रत्येकी 2 गुण मिळविले. विठ्ठल हबिब (जिमखाना), स्वप्निल एळवे (हुबळी) यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आले.

जिमखाना मैदानावर सकाळी खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात सुपर एक्स्प्रेस युनियन जिमखानाके 20 षटकात 9 बाद 148 धावा केल्या. विठ्ठल हबिबने 6 षटकार व 3 चौकारासह 76 तर रोहित पाटीलने 1 षटकार, 3 चौकारासह 44 धावा केल्या. मोहन मोरेतर्फे संतोष सुळगे पाटीलने 36 धावात 4, तर आनंद कुंभार, नरेंद्र मांगोरे व रवी पिल्ले यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना मोहन मोरे संघाने 20 षटकात 9 बाद 146 धावाच केल्याने त्यांना केवळ 2 धावांनी पराभव पत्करावा लागला. संतोष सुळगे पाटीलने 5 षटकार, 1 चौकारासह 28 चेंडूत 51, नरेंद्र मांगुरेने 17, रवी पिल्लेने 13,  रूद्रगौडा पाटीलने 11 धावा केल्या. जिमखानातर्फे विठ्ठल हबिबने 16 धावात 3, रोहित पाटीलने 33 धावात 2, दीपक राक्षेने 42 धावात 2, अमर घाळी व पुरूषोतम जकबाल यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

दुसऱया सामन्यात अर्जुनवीर श्री साई सोशल संघाने 20 षटकात 9 बाद 146 धावा केल्या. सुजय सातेरीने 7 चौकारासह 50, अर्जुन पाटीलने 21, वैभव कुरीबागीने 20 धावा केल्या. साई स्पोर्ट्सतर्फे स्वप्निल एळवेने 30 धावात 3, किरण तारळेकरने 21 धावात 2, भरत गाडेकरने 31 धावात 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना साई स्पोर्ट्स हुबळी टायगर्स संघाने 18.2 षटकात 5 बाद 149 धावा करून सामना 5 गडय़ांनी जिंकला. स्वप्निल एळवेने 1 षटकार, 6 चौकारासह 28 चेंडूत 45, यश कळसण्णावरने 5 चौकारासह 42, कृष्णा बागडीने 25 धावा केल्या. अर्जुनवीरतर्फे सोमेश्वर नवलगीमठने 24 धावात 3, शुभम भादवणकरने 32 धावात 2 गडी बाद केले.

सामन्यानंतर प्रमुख पाहुणे प्रदीप तानजी, राहुल कंगुडकर, चंद्रकांत बांडगी यांच्या हस्ते सामनावीर विठ्ठल हबिब, इम्पॅक्ट खेळाडू रोहित पाटील, उत्कृष्ट झेल संतोष सुळगे पाटील, सर्वाधिक षटकार विठ्ठल हबिब यांना तर दुसऱया सामन्यात प्रमुख पाहुणे दीपक पवार, संजय सातेरी, संजय मोरे यांच्या हस्ते सामनावीर स्वप्निल एळवे, इम्पॅक्ट खेळाडू यश कळसण्णावर, उत्कृष्ट झेल स्वप्निल एळवे, सर्वाधिक षटकार अर्जुन पाटील यांना चषक देवून गौरविण्यात आले.

Related Stories

40 ग्राम पंचायतींना मिळणार कचरावाहू वाहने

Omkar B

न्यायालयीन वादामुळे मनपाच्या महसुलावर पाणी

Omkar B

सेंट जोसेफ, सेंट पॉल्स, संत मीरा, इस्लामिया संघांची विजयी सलामी

Amit Kulkarni

जांबेटी येथे छायाचित्रकारांची गळफास घेऊन आत्महत्या

Patil_p

उतारा केंद्र तब्बल आठ दिवसांपासून बंद

Patil_p

विमान उड्डाणांमध्ये बेळगाव राज्यात दुसऱयास्थानी

Amit Kulkarni