Tarun Bharat

सुपर टॅलेंट रियालिटी शोमध्ये कुडाळचा साईल सातार्डेकर प्रथम

कुडाळ/प्रतिनिधी-

पी. के. डान्स क्रु कोल्हापूर (कोल्हापूर) प्रस्तुत महाराष्ट्राचा सुपर टॅलेंट या रियालीटी शो डान्सिंग स्पर्धेत कुडाळ-पिंगुळी येथील साईल महेंद्र सातार्डेकर याने एज गृप सी मध्ये प्रथम क्रमांक मिळविला. मांडरे’ज डान्स फिटनेस स्टुडिओचे प्रसाद कमतनुरे (प्रिन्स) यांच्या मार्गदर्शनाने लॉकडाऊनच्या काळात मुलांच्या सर्वांगीन विकासाला प्राधान्य देणे, त्यांचा कलागुणांना वाव देण्याकरीता या ऑनलाइन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेकरीता महाराष्ट्राततील 100 स्पर्धेकांनी सहभाग नोंदविला होता.

यामध्ये डान्सिंग आणि सिगिंग यामध्ये स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत तीन फेेर्‍या अंतर्गत सर्व कलाकारांनी वयोगट 5 ते 40 अशा विविध वयोगटात उकृष्ठ सादरीकरण केले. या मधून 15 स्पर्धेकांची निवड करण्यात आली होती. नुकताच स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. डान्सिंग मध्ये एज गृप सी मध्ये साईल महेंद्र सातार्डेकर हा विजेता ठरला आहे. या स्पर्धे करीता प्रसाद कमतनुरे यांनी परीक्षक म्हणुन काम पाहिले. डॉ. अनिता पृथ्वीराज मांडरे यांचे सहकार्य लाभले. या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रशस्तिपत्र देउन गौरविण्यात आले .चिमणी पाखरं डान्स अकॅडमीचे कोरीओग्राफर रवी कुडाळकर यांचे साईल याला मार्गदर्शन लाभले.

Related Stories

‘अथर्व इन्फ्रा’चा रत्नागिरीकरांना गंडा

Patil_p

तब्बल 14 वर्षांनंतर प्रकल्पग्रस्ताचे घर प्रकाशमय

NIKHIL_N

हर्णेची बदनामी करणाऱयावर गुन्हा दाखल करणार: हजवानी

Patil_p

Ratnagiri; रत्नागिरीत अनेक तालुक्यात पुरस्थिती; एनडीआरफचे पथक दाखल

Abhijeet Khandekar

गुहागरातून आज 49जण बुलढाणा, लातूर, साताऱयाला होणार रवाना

Patil_p

शिक्षक हत्याप्रकरणी सुनावणी सुरू

NIKHIL_N