Tarun Bharat

सुप्रिया सुळेंनी ‘या’ कारणासाठी निर्मला सीतारमण यांचे केले अभिनंदन

मुंबई /ऑनलाईन टीम

अल्प बचत योजनांवरील व्याज दर कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने अवघ्या काही तासात मागे घेतला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे सोशल मीडियाच्या माध्यमातून आभार मानले. यासोबत त्यांनी पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाचा गॅस दरवाढही मागे घेण्याची विनंती देखील केली.

सुप्रिया सुळे यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, अल्प बचतीवरील व्याजदरांमध्ये कपात करण्याचा निर्णय सरकारने तातडीने फिरविला. सरकारचे याबद्दल अभिनंदन. यामुळे सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला. आता केंद्र सरकारने अशीच तत्परता पेट्रोल, डिझेल आणि स्वयंपाकाचा गॅस यांवर लादलेली मोठी दरवाढ देखील तात्काळ मागे घ्यावी ही विनंती.

आर्थिक वर्ष 2021-22 च्या पहिल्या तिमाहीत छोट्या बचत योजनांवरील व्याज कमी करण्यात आल्याची घोषणा बुधवारी रात्री करण्यात आली होती. परंतु गुरुवारी सकाळी हा निर्णय मागे घेण्याची अधिकृत घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली. त्यामुळे व्याजदर हे जैसे थे राहतील.

वित्त मंत्रालयाच्या नजरचुकीचे अजिबात नवल वाटले नाही. पण वित्त मंत्रालय नेमक कोण चालवतय? आणि या मंत्रालयाने शेवटचा कोणता निर्णय विचारपूर्वक घेतला होता? नोटाबंदी, जीएसटीची अंमलबजावणी की कोरोना संदर्भातील आर्थिक पॅकेज? असा सवाल माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केला आहे.

Related Stories

सांगली : कोयनेतून पाण्याच्या विसर्गाचे तूर्तास नियोजन नाही

Archana Banage

अक्कलकोट शहरात पोलीस ठाणे व नगरपरिषद कडून संयुक्त कारवाई

Archana Banage

अमरावती,यवतमाळमध्ये कोरोना विषाणूचा कोणताही परदेशी स्ट्रेन आढळलेला नाही : आरोग्य विभाग

Tousif Mujawar

काश्मीर, चंदीगडमध्ये एनआयएचे छापे

Patil_p

माजी आयपीएस अमिताभ ठाकूर लढविणार निवडणूक

Patil_p

पाच वर्षीय चिमुकल्याचा दिल्ली ते बेंगळूर विमानप्रवास

Tousif Mujawar