नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
देशभरात कोरोना संसर्गाच्या उद्रेकामुळे सुप्रीम कोर्टाने आता स्वत:हून दखल घेतली आहे. सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला कोरोना परिस्थितीवरुन फटकारलं आहे. कोर्टाने केंद्राला नोटीस पाठवून कोरोना उपायाबाबत राष्ट्रीय स्तरावर काय तयारी केली आहे , अशी विचारणा केली.
सुप्रीम कोर्टाने चार मुद्द्यांवर केंद्र सरकारला नोटीस पाठवली आहे. ऑक्सिजनचा पुरवठा, महत्वाच्या औषधांचा पुरवठा, लसीकरणाची पद्धत आणि लॉकडाउन जाहीर करण्याचा अधिकार यासंबंधी सुप्रीम कोर्टाने केंद्राला विचारणा केली आहे. दरम्यान हरिश साळवे यांची अॅमिकस क्युरी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या खंडपीठाने करोनाच्या तयारीसंबंधी सध्या सहा राज्यांमधील उच्च न्यायालयात सुनावणी सुरु असल्याची दखल घेतली. दिल्ली, मुंबई, सिक्कीम, मध्यप्रदेश, कोलकाता आणि अलाहाबाद या राज्यांचा यामध्ये समावेश आहे. ते चांगल्या हितासाठी कार्यक्षेत्र वापरत आहेत. परंतु यामुळे संभ्रम निर्माण होत आहे, असं सरन्यायाधीशांनी म्हटलं.


previous post
next post