Tarun Bharat

सुभाषचंद्र बोस यांची विचारसरणी सर्वांना मार्गदर्शक

विविध ठिकाणी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 125 वी जयंती साजरी : जयंतीनिमित्त विविध शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सॅनिटायझरचे वाटप

प्रतिनिधी / बेळगाव

गौंडवाड मराठी प्राथमिक शाळा गौंडवाड मराठी प्राथमिक शाळेमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस जयंतीनिमित्त सॅनिटायझरचे वितरण व मान्यवरांचा सत्कार असा संयुक्त कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष महेश सांबरेकर होते.

प्रारंभी शाळेच्या मुख्याध्यापिका एन. एस. चव्हाण यांनी उपस्थितांचे स्वागत करून संयुक्त कार्यक्रमाचा उद्देश सांगितला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. नूतन ग्रा. पं. सदस्य यल्लोजी पाटील यांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी यल्लोजी पाटील यांनी कोरोना महामारीपासून विद्यार्थ्यांच्या संरक्षणासाठी सॅनिटायझरचे वितरण केले.

सत्कार कार्यक्रम

नेताजी सुभाषचंद्र बोस जयंतीचे औचित्य साधून नवनिर्वाचित ग्रा. पं. सदस्य यल्लोजी पाटील यांचा शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष महेश सांबरेकर यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी विनायक पाटील, कल्लाप्पा अष्टेकर, हरिष पाटील, निळकंठ पवार, मारुती निलजकर, महादेव पाटील, भरत कोलकार, मनोज गावस्कर, एन. आर. वड्डेबैलकर, एन. सी. जाधव, एम. एस. बिर्जे आदी उपस्थित होते. मुख्याध्यापिका एन. एस. चव्हाण यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

मराठी टीचर्स ट्रेनिंग महाविद्यालय

बेळगाव : बेळगाव जिल्हा प्राथमिक शिक्षण समितीच्या टिळकवाडी येथील मराठी टीचर्स ट्रेनिंग महाविद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 125 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रारंभी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्या एच. पी. परुळेकर व प्रा. एम. के. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

‘तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दुँगा’ असे म्हणणाऱया सुभाषचंद्र बोस यांचा स्वातंत्र्य लढय़ातील सहभाग याबाबत प्राचार्या परुळेकर यांनी आढावा घेतला. यावेळी प्रा. एम. बी. हुंदरे, प्रा. व्ही. पी. महाजन, एस. एस. नाझरे तसेच डी. एड. प्रथम व द्वितीय वर्षाचे प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

सुभाषचंद्रनगर नागरिक संघटना

बेळगाव : सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेल्या सुभाषचंद्रनगर, टिळकवाडी येथील नागरिक संघटनेच्यावतीने दरवषीप्रमाणे यंदाही सुभाषचंद्र बोस यांची 125 वी जयंती शनिवारी साजरी करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख वक्ते सूर्यकांत शानभाग यांच्या हस्ते सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

 सुभाषचंद्र बोस यांची विचारसरणी आणि जीवनशैली ही संपूर्ण हिंदुस्तानाला सातत्याने मार्गदर्शन देणारी ठरली आहे. सुभाषचंद्र बोस यांनी देशासाठी केलेला त्याग हा प्रेरणादायी आहे त्यामुळे त्यांचे जीवन चरित्र वाचून सुभाषचंद्र बोस यांना समजावून घेण्याची गरज आहे, असे विचार शानभाग यांनी व्यक्त केले

 प्रारंभी उपस्थितांचे स्वागत करून संघटनेचे अध्यक्ष आप्पासाहेब गुरव यांनी संघटनेच्या कार्याचा आढावा घेतला. खजिनदार गजाननराव राणे, उपाध्यक्ष चंद्रशेखर इटी, प्रकाश गोखले, वासुदेव खणगावकर, महेंद्र इब्राहिमपूरकर, दत्ता कदम, धनंजय पटेल, मोहनराव ईजारे, विजयकुमार बुदिहाळ आदी सदस्य उपस्थित होते. सचिव राजेश तेंडुलकर यांनी आभार मनले.

शिवाजी हायस्कूल, कडोली

कडोली : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचालित कडोली येथील श्री शिवाजी हायस्कूलमध्ये सुभाषचंद्र बोस जयंती साजरी करण्यात आली.

जि. पं. उपाध्यक्ष अरुण कटांबळे यांच्या हस्ते सुभाषचंद्र बोस प्रतिमेचे पूजन तर तालुका अधिकारी एम. पी. मरनूर यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले. यावेळी साक्षी टेपुगडे व आर. के. पाटील यांची भाषणे झाली. डिस्ट्रिक्ट युथ सर्व्हिस ऑफीस (नेहरूनगर) यांच्यावतीने अरुण कटांबळे, एम. पी. मरनूर, मुख्याध्यापिका वर्षा पाटील, क्रीडा शिक्षक एन. आर. पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांना धान्य वाटप करण्यात आले.  सूत्रसंचालन एस. डी. पाटील यांनी केले. लता हागिदळे यांनी आभार मानले.

मराठी विद्यानिकेतन

बेळगाव : येथील मराठी विद्यानिकेतनमध्ये सुभाषचंद्र बोस जयंती शनिवारी साजरी करण्यात आली. प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित शाळेच्या शिक्षिका नम्रता पाटील यांच्या हस्ते सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सुभाषचंद्र बोस व आझाद हिंद सेना यांचे नाते उलगडून सांगताना त्या म्हणाल्या, पानिपतकार विश्वास पाटील यांच्या महानायक या पुस्तकातून सुभाषचंद्र बोस सखोलपणे समजतात. त्यांचा पराक्रम आपल्याला नेहमीचे स्फूरण देतो. त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग पाटील यांनी उलगडून सांगितले.

यावेळी मुख्याध्यापक आय. व्ही. मोरे, जी. व्ही. सावंत, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन लता पाटील यांनी केले.

आदर्श विद्या मंदिर

बेळगाव : अळवण गल्ली येथील आदर्श मराठी विद्या मंदिर शाळेत स्वातंत्र्य संग्रामाच्या निर्णायक पर्वातील अग्रणी नेते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. प्रतिमापूजन मुख्याध्यापक विठ्ठल पाटील यांनी केले. जे. बी. पाटील यांनी शारीरिक शिक्षण दिनाचे महत्त्व पटवून दिले.

सूत्रसंचालन एम. आर. शिनोळकर यांनी केले. बी. सी. बागेवाडी यांनी आभार  मानले. एम. बी. कुलकर्णी, माया लोहार, छाया सुतार, चैतन्य गावडे व विद्यार्थी उपस्थित होते.

Related Stories

जागेअभावी 220 केव्ही स्टेशनचे काम रखडले

Patil_p

सोन्याने गाठली पन्नाशी…..

Patil_p

मतदारयादी सर्वेक्षणाचे काम लवकरच

Patil_p

कुख्यात गुन्हेगारांना पुन्हा एकदा ‘आकाश’ मोकळे

Amit Kulkarni

मराठी उमेदवारांना इतर जिल्हय़ात संधी मिळणार का?

Amit Kulkarni

येळ्ळूर चांगळेश्वरी देवी यात्रोत्सव आजपासून

Amit Kulkarni