Tarun Bharat

सुभाषबापू देशमुख यांच्याकडून वचनपूर्तीला सुरवात

प्रतिनिधी / सांगली
ऑगस्ट 2019 मध्ये सांगली व परिसरात आलेल्या महापुरावेळी नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना मदतीचा हात देत पूरग्रस्त हरिपूर गाव दत्तक घेण्याची घोषणा करणारे मा. सहकार व पालकमंत्री सुभाषबापू देशमुख यांनी दिलेल्या आश्वासनांची पुर्तता सुरू केली. हरिपूरमधील संगमेश्वर मंदिर, जिल्हा परिषद शाळा आदी ठिकाणी सुमारे 50 लाख रूपयांच्या विकास कामांचा शुभारंभ केला.
आमदार माजी पालक मंत्री सुभाषबापू देशमुख यांच्या लोकमंगल समूह आणि सोलापुर सोशल फौंडेशन परिवारातर्फे आलेल्या महापुरानंतर हरिपूर गाव दत्तक घेण्यात आले. त्यावेळी संगमेश्वर मंदिर येथील काम सुरू करण्यात आले तसेच जि. . मराठी मुलांची व मुलीची शाळा दुरुस्ती काम व पुस्तके आणि शाळेच्या बॅगपुस्तके देण्यात आली.

सोलापूर सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून पूरग्रस्त गावांचे पालकत्व घेतलेल्या मिरज तालुक्यातील हरीपुर या गावात संगमेश्वर देवस्थान येथील फरशी जीर्णोद्धार कामाचे भूमिपूजन मार्गदर्शक आ. सुभाष (बापू) देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
फेब्रुवारी महिन्यामध्ये सोलापूर महोत्सव फेस्ट २०२० आयोजित करण्यात येणार आहे, या फेस्टिवलला भेट देण्यासाठी निमंत्रण यावेळी उपस्थित ग्रामस्थांना दिले. तसेच शालेय साहित्य व बॅग वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनी घ्यावयाची आरोग्य विषयक काळजी, दररोजचा आहार व शालेय अभ्यास याविषयी समूह संवाद व मार्गदर्शन यावेळी करण्यात आले. सोलापूर सोशल फाउंडेशन करत असलेल्या उपक्रमांची माहितीही यावेळी देण्यात आली.
यावेळी सरपंच विकास हणबर, कल्लाप्पा सुतार, अरविंद तांबवेकर, गणपत सांळूखे विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.

Related Stories

जेएनयू वाद : धास्तावलेल्या कंपन्यांनी दीपिकाच्या जाहिराती थांबवल्या

prashant_c

जामिया हिंसाचार : ७० जणांचे फोटो दिल्ली पोलिसांकडून सादर

prashant_c

जलयुक्त शिवारची कामं थांबवली !

prashant_c

‘आप’ चे कॅम्पेन साँग तयार : ‘लगे रहो केजरीवाल’

prashant_c

अस्थिर दराने निपाणी सराफ पेठेत शांतता

Patil_p

जे. एन. यु. हिंसाचार प्रकरणी , ट्विंकल खन्नाचा सरकारला इशारा

Archana Banage