Tarun Bharat

सुभेदार काशिनाथ नायक यांना 10 लाखांचे बक्षीस

सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राला प्रारंभी दिले होते प्रशिक्षण

प्रतिनिधी /बेंगळूर

टोकियो ऑलिम्पिक्समध्ये सुवर्णपदक जिंकलेल्या भारताच्या नीरज चोप्राला प्रारंभी प्रशिक्षण दिलेल्या राज्यातील लष्करातील सुभेदार काशिनाथ नायक यांना राज्य सरकारने 10 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. नीरज चोप्राला सुवर्ण पदक मिळविण्यात कारवार जिल्हय़ाच्या शिरसीतील काशिनाथ नायक यांचेही पात्र महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्यांना 10 लाखांचे बक्षीस देण्यात येणार असल्याचे क्रीडामंत्री डॉ. नारायणगौडा यांनी पत्रकाद्वारे कळविले आहेत.

ऑम्लिपिक सुवर्णपदक मिळविलेल्या नीरज चोप्रासह त्याला प्रारंभी प्रशिक्षण दिलेल्या काशिनाथ नायक यांचे क्रीडामंत्र्यांनी अभिनंदन केले. 2010 च्या कॉमनवेल्थमध्ये काशिनाथ यांनी कांस्यपदक जिंकले होते. सर्वोत्कृष्ट खेळाडू काशिनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या नीरज चोप्राने सुवर्णपदक मिळवित देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. या कामगिरीबद्दल सुभेदार काशिनाथ नायक यांना युवा सबलीकरण आणि क्रीडा खात्याकडून 10 लाखांचे बक्षीस दिले जाईल, असे त्यांनी सांगितले. याचबरोबर ऑम्लिपिकमध्ये सहभागी राज्यातील खेळाडू अशोक, श्रीहरी नटराज, पौवाद मिर्जा यांचाही सन्मान केला जाईल, असे मंत्री नारायणगौडा म्हणाले.

Related Stories

कर्नाटक: नर्सिंग कॉलेजमधील ४० विद्यार्थी कोरोनाबाधित

Archana Banage

कर्नाटक: लसीकरणात पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जास्त

Archana Banage

कर्नाटक : परिवहन कर्मचाऱ्यांचा संप मागे

Archana Banage

सहकार क्षेत्राला अग्रस्थानी नेण्यासाठी सहकार्य

Omkar B

विकेंड कर्फ्यू रद्द : नाईट कर्फ्यू कायम

Amit Kulkarni

कर्नाटक: द्वितीय पीयूसी परीक्षा ऑनलाईन होण्याची शक्यता

Archana Banage