श्रीविजयचे सुवर्ण बेट, दुर्लभ मूर्ती हस्तगत
शतकांपासून दक्षिण पूर्व आशियातील देश इंडोनेशिया हा भारतीय संस्कृतीचा विस्तार असल्याचे मानले जात राहिले आहे. तेथील सुमात्रा बेटामध्ये सातव्या ते 13 व्या शतकापर्यंत श्रीविजय राजवंशाचे राज्य राहिले. पेलंगबांगला या राजवंशाचे सुवर्ण बेट म्हटले जात होते. भारतीय चोल राजांनी तेथे आक्रमण करून बहुमूल्य खजिना लुटला होता आणि श्रीविजय राजवंशाच्या राजांना कैद केले होते.


पण तेथून परतताना हा खजिना गायब झाला होता. धोकादायक मगरींनी भरलेल्या पेलंगबांगच्या मुसी नदीत लोक या खजिन्याचा शोध घेत राहिले. आता सुमारे 700 वर्षांनी मच्छिमारांनी या बहुमूल्य खजिन्याचा शोध लावला आहे. सागरी संशोधक डॉ. शॉन किंगस्ले यांच्यानुसार हा सुमात्राच्या गायब सुवर्ण बेटाचा शोध आहे.


समुद्रांवर होते राज्य
इतिहासकारांनुसार सुमात्राच्या श्रीविजय राजवंशाचे 13 व्या शतकापर्यंत दक्षिणपूर्व आशियातील बेटांवर राज्य होते. सागरी शक्ती असल्याने याचा फैलाव भारताचा पूर्व किनारा आणि दक्षिण चीन समुद्रापर्यंत होता. तेथे यापूर्वी मिळालेली भारतीय आणि चिनी नाणी याचा पुरावा आहेत. आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रांमध्ये श्रीविजय राजवंशाचे एकछत्री राज्य होते. तेथे बौद्ध आणि हिंदू धर्माशी संबंधित मूर्ती आढळल्या आहेत.