Tarun Bharat

सुरक्षा दलांवर ग्रेनेड हल्ला; CRPF च्या दोन जवानांसह 4 जखमी

ऑनलाईन टीम / श्रीनगर :

उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर ग्रेनेड हल्ला केला आहे. या हल्ल्यात सीआरपीएफच्या दोन जवानांसह दोन नागरिक जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दहशतवाद्यांच्या शोधासाठी इतर सुरक्षा दल तैनात करण्यात आले असून, संपूर्ण भागात सर्च ऑपरेशन सुरू आहे.

दरम्यान, श्रीनगरमधील हैदरपोरा भागात सोमवारी झालेल्या चकमकीत जखमी दहशतवाद्याच्या आणखी एका मदतनीसाचा मृत्यू झाला. या चकमकीत पाकिस्तानी दहशतवाद्यासह अन्य दोन दहशतवादी आणि दोन मदतनीस ठार झाले. ठार झालेला पाकिस्तानी दहशतवादी रविवारी डाऊनटाऊन भागात सुरक्षा दलांवर झालेल्या हल्ल्यात सामील झाला होता. या दहशतवाद्यांकडून दोन पिस्तूल आणि इतर सामान जप्त करण्यात आले आहे.

Related Stories

कोल्हापुरात पावसाची जोरदार एंट्री; वादळी वाऱ्यासह गारपीट

Archana Banage

भारतावरील निर्बंध, अमेरिकेत मतभेद

Patil_p

अमेरिकेतील मृतांचा आकडा 40 हजारांपार

prashant_c

मतदानानंतरही काँग्रेसमध्ये गटबाजी

Patil_p

सचिन पायलट लवकरच भाजपमध्ये; राष्ट्रीय उपाध्यक्षांचा दावा

Archana Banage

संजय वर्मा होणार कॅनडातील भारताचे राजदूत

Patil_p
error: Content is protected !!