Tarun Bharat

सुरक्षा महत्वाची

सध्या रस्त्यांवरील वाढते अपघात आणि बेदरकार वाहन चालकांना कसे रोखावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या आर्थिक सुबत्तेमुळे मध्यमवर्गीय उच्चवर्गीयांकडे घरोघरी दुचाकी-चारचाकी वाहने दिसतात. सर्वसामान्य माणूसही यापासून लांब नाही. इतकी वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. तरुणांना वाहन सुसाट वेगात चालविण्याची हौस असते; पण त्याचबरोबर वाहतुकीचे नियमही ठाऊक असणे अत्यावश्यक असते. काही वाहन चालक मद्यप्राशन करून वाहन चालवतात, तर बऱयाचदा अल्पवयीन मुलेही वाहन चालवताना दिसतात. वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन, वेगावर नियंत्रण व हेल्मेटचा वापर या बाबी कटाक्षाने पाळल्याच जाव्यात.   

शिकाऊ लायसन्स करिता वाहतुकीचे सर्वसाधारण नियम

?   वाहन चालकाने वेग मर्यादेचे उल्लंघन करू नये.

?   भार क्षमतेपेक्षा जादा मालाची वाहतूक करू नये.

?   वाहतूक चिन्हांचे व संकेतांचे उल्लंघन करू नये.

?   वाहन चालविताना योग्य इशाऱयांचा वापर करावा.

?   वाहन धोकादायक स्थितीत उभे करून ठेवू नये.

?   वाहनाच्या टपावर बसून किंवा दरवाजातून लेंबकळत प्रवाशांची वाहतूक करू नये.

? चालकास अडथळा होईल अशा ठिकाणी प्रवासी बैठक किंवा एखादी वस्तू ठेवू नये.

?   योग्य ती काळजी घेतल्याशिवाय कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी वाहन उभे करू नये.

?   शिरस्त्राण (हेल्मेट) परिधान न करता वाहन चालवू नये.(राज्य व राष्ट्रीय महामार्गावर)

?   रस्त्यावर वाहन तपासणीवेळी वाहनाची संबंधित सर्व प्रमाणपत्रे सादर करणे.

?   गणवेशधारी अधिकाऱयाच्या इशाऱयानंतर वाहन थांबविणे.

?   अपघात घडल्यानंतर संबंधित माहिती 24 तासांच्या आता पोलिसांना कळविणे व अपघातग्रस्तांना योग्य ती मदत करणे.

?   दारू किंवा अंमली पदार्थांच्या नशेत वाहन चालवू नये.

?   मानसिक किंवा शारीरिकदृष्टय़ा अपात्र असताना वाहन चालवू नये.

? वाहन चालवीत असताना मोबाईलचा वापर करू नये.

Related Stories

सुवर्णा म्हेत्रे यांचे निधन

Archana Banage

वन्यजीव सुरक्षा दिवस

tarunbharat

काटेरी तिळगुळ

Patil_p

साहित्यिक सावित्री

Patil_p

आत्मविश्वास

tarunbharat

इतिहासाची प्रेरणा देणारा ‘जाणता राजा’

Patil_p
error: Content is protected !!