Tarun Bharat

सुरक्षित अंतर ठेवूनच खरेदी-विक्री करा

सांखळी/प्रतिनिधी :

 सांखळी शहरात कोरोनाचे रूग्ण सापडताच सांखळी व्यापारी संघटनेने स्वखुशीने बाजारपेठ चार दिवस बंद चा निर्णय घेतला, त्यास दुकानदारांनी चांगला प्रतिसाद दिला, याविषयी मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या शी चर्चा झाल्यावर लोक हितार्थ सामाजिक अंतर ठेवून आणि सरकारने घालून दिलेले नियम पाळून हवी असल्यास दुकाने सुरू करण्याचे व्यापारी संघटनेने जाहीर करताच काहींनी दुकाने सुरू केली मात्र आज आठवडा बाजार असूनही हवे तसे ग्राहक फिरकले नसल्याने सांखळी बाजार थंड दिसत होता तसेच सांखळी कोरोना रुग्ण सापडल्याने आस-पासच्या गावातील ग्राहक आणि विपेते सुरक्षा म्हणून फिरकलेच नाही असे पियुष डांगी यांनी या विषयी बोलताना सांगितले

दुकान मालकांनी स्वतः निर्णय घ्यावा: सत्यावन काणेकर

आपल्या देशावर आणि राज्यावरली आर्थिक संकट आले असून त्यात मोठया प्रमाणात व्यापारी संहटनेचे नुकसान होत असते कोरोना महामारी चे संकट आले असले तरी आपण कायमस्वरूपी दुकाने बंद ठेऊ शकत नाही तेव्हा जे दुकानदार सुरक्षित राहून सरकारच्या नियमांचे पालन करून दुकान उघडू शकतो असे मत व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सत्यावन काणेकर यांनी या विषयी बोलताना सांगितले

ङसांखळी बस थांब वर गर्दी नको

सांखळी मतदार संघातील ग्रामीण भागातील आणि पर्यें मतदारसंघातिल नागरिकांना सांखळी शहरातिल बाजारपेठ मुख्य आहे त्यामुळे शेकडो लोक ये-जा करत असतात काहींना आठवडय़ात एकदाचं समान घेण्याची सवय असते अशी गरीब लोक बस च्या प्रतिक्षे सांखळी बस थांब वर गर्दी करताना दिसत आहे तेव्हा प्रत्येक नागरिकांनी सुरक्षित अंतर ठेवून उभे रहावे असे हे व्यापारी संघटनेकडून सूचित करण्यात यावे असे जागृत नागरिकांचे म्हणजे आहे न पेक्षा गावागावात कोरोना महामारीचे रुग्ण सापडतील आणि ते आवरणे सरकारला शक्मय होणारं नाही असेही त्यांचे म्हणणे आहे

Related Stories

खासगी हॉस्पिटलमधूनही होणार लसीकरण

Amit Kulkarni

दयानंद केंद्राचा त्रिवेणी सोहळा उत्साहात

Amit Kulkarni

‘अ’ गट नाटय़स्पर्धेत रुदेश्वरचे ‘पालशेतची विहिर’ प्रथम

Patil_p

घरोघरी कचरा संकलन कंत्राटदारांना 3 महिन्यांची मुदतवाढ देण्यास विरोध

Amit Kulkarni

भाजपविरोधात काँग्रेस मूग गिळून गप्प का?

Amit Kulkarni

आम आदमी पक्ष सपशेल नापास

Amit Kulkarni