Tarun Bharat

सुरक्षेच्यादृष्टीने कामांच्या ठिकाणी लावल्या रिबन्स

स्मार्ट सिटीच्या अधिकाऱयांना उशिरा आली जाग

प्रतिनिधी / बेळगाव

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत सुरू असलेल्या कामांचा फटका नागरिकांना बसत आहे. मध्यवर्ती बसस्थानकाच्या कामाच्या ठिकाणी नागरिकाचा बळी गेला. याची दखल घेऊन कामे सुरू असलेल्या ठिकाणी सुरक्षेच्यादृष्टीने उपाययोजना करण्याची सूचना स्मार्ट सिटी कंपनीचे कार्यकारी संचालक प्रवीण बागेवाडी यांनी अधिकाऱयांना केली. त्यामुळे शहरात विविध ठिकाणी कामे सुरू असलेल्या ठिकाणी सुरक्षेच्यादृष्टीने रिबन्स लावण्यात आल्या.

स्मार्ट सिटीच्या अर्धवट कामांच्या ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने कोणतीच खबरदारी घेण्यात आली नाही. तसेच अर्धवट कामे असलेल्या ठिकाणी सळय़ा उघडय़ावर आहेत. काही ठिकाणी चरी खोदून ठेवण्यात आल्या आहेत. परिणामी वाहनधारक आणि पादचाऱयांना धोका निर्माण झाला आहे. स्मार्ट सिटीच्या अर्धवट कामांमुळे आतापर्यंत चारहून अधिक जणांचा बळी गेला आहे. मागील आठवडय़ात मध्यवर्ती बसस्थानक परिसरात एका व्यक्तीचा बळी गेल्याने अधिकाऱयांना जाग आली आहे.

नागरिकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने आवश्यक खबरदारी घेण्याचा आदेश स्मार्ट सिटी कंपनीचे कार्यकारी संचालक प्रवीण बागेवाडी यांनी दिला आहे. शहापूर, रामदेव हॉटेल, धर्मनाथ चौक तसेच स्मार्ट सिटीची कामे सुरू असलेल्या ठिकाणी सुरक्षेबाबत उपाययोजना राबविण्याची सूचना केल्या होत्या. त्यामुळे शुक्रवारी कामांच्या ठिकाणी सुरक्षेच्यादृष्टीने रिबन्स लावल्या आहेत.

Related Stories

शिवसेनेमध्ये तरुणाईचा प्रवेश

Amit Kulkarni

माहेश्वरी अंध मुलांच्या शाळेमध्ये कार्यशाळा

Amit Kulkarni

सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने महिलेवर अंत्यसंस्कार

Patil_p

रोटरी क्लब ऑफ नॉर्थचा अधिकारग्रहण समारंभ

Amit Kulkarni

लोकमान्य सोसायटीची लोकमान्य नारी सन्मान ठेव योजना सुरू

Amit Kulkarni

बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू

Patil_p