Tarun Bharat

सुरेश अंगडी यांचे दिल्लीत स्मारक निर्माण करा

बेंगळूर : मुख्यमंत्री येडियुराप्पा यांना निवेदन देताना सुरेश अंगडी यांचे जावई संकल्प शेट्टर आणि डॉ. राहुल पाटील. समवेत मंत्री जगदीश शेट्टर.

प्रतिनिधी / बेंगळूर

नवी दिल्ली येथे अलीकडेच निधन झालेले केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांचा अंत्यविधी झालेल्या ठिकाणी स्मारक निर्माण करण्यासंबंधीचे निवेदन मुख्यमंत्री येडियुराप्पा यांना देण्यात आले आहे. सुरेश अंगडी यांचे जावई संकल्प शेट्टर आणि डॉक्टर राहुल पाटील यांनी बुधवारी मुख्यमंत्र्यांची बेंगळूरमध्ये भेट घेऊन निवेदन दिले.

मागील आठवडय़ात बुधवारी केंद्रीयमंत्री सुरेश अंगडी यांचे नवी दिल्लीतील एम्स इस्पितळात निधन झाले. कोविड-19 शिष्टाचारानुसार त्यांच्या पार्थिवावर नवी दिल्लीतील द्वारकानगर येथील लिंगायत रुदभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. तेथे स्मारक निर्माण करण्यात यावे. तसेच रुद्रभूमीसाठी संरक्षक कठडा निर्माण करण्यात यावा. यासंबंधी अधिकाऱयांना सूचना द्याव्यात, अशी विनंती मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

Related Stories

भेंडी, वांगी, टोमॅटो दरात घसरण

Patil_p

पथदीप बंद असल्याने आझाद गल्लीत अंधार

Amit Kulkarni

चेकपोस्टना जिल्हाधिकाऱयांची भेट

Amit Kulkarni

जिल्हाधिकाऱ्यांचे आज अलतगा येथे ग्रामवास्तव्य

Amit Kulkarni

डॉ.सचिन मुरगुडे यांचाही मृत्यू

Amit Kulkarni

बेळगावला सलग तिसऱया दिवशीही दिलासा

Patil_p
error: Content is protected !!