Tarun Bharat

सुरेश वाबळे यांनी घेतला सोसायटीच्या कामाचा आढावा

प्रतिनिधी/ बेळगाव

फेडरेशन ऑफ मल्टिस्टेट को-ऑप. सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष सुरेश वाबळे यांनी नुकतीच काळी आमराई येथील सहय़ाद्री आंतरराज्य सहकारी संस्थेला भेट दिली. त्यांच्यासमवेत विठ्ठलराव वाडगे व कोल्हापूर येथील प्रसिद्ध वकील व आंतरराज्य सहकारी संस्थांचे मार्गदर्शक ऍड. एस. एस. गदगे उपस्थित होते.

पुणे येथील फेडरेशन ऑफ मल्टिस्टेट को-ऑप. सोसायटीज या संघटनेच्यावतीने आंतरराज्य सहकारी संस्थांना मार्गदर्शन केले जाते. महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश व कर्नाटक राज्यातील अनेक आंतरराज्य सहकारी संस्था या संघटनेचे सदस्य आहेत.

प्रारंभी सुरेश वाबळे यांनी सोसायटीच्या कामकाजाचा आढावा घेतला. आंतरराज्य सहकारी संस्था तसेच सर्वच सहकारी संस्थांना दैनंदिन व्यवहारात येणाऱया अडीअडचणी, सहकारी संस्थांवर लादले गेलेले जाचक निर्बंध आदी विषयांवर यावेळी चर्चा करण्यात आली. आंतरराज्य संस्थांच्या समस्या सोडविण्यासाठी मे. सेंट्रल रजिस्ट्रर ऑफ को-ऑप. सोसायटीज नवी दिल्ली यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही यावेळी सुरेश वाबळे यांनी दिली.

प्रारंभी चेअरमन पी. पी. बेळगावकर यांनी स्वागत केले. ज्येष्ठ सल्लागार ऍड. राजाभाऊ पाटील यांच्या हस्ते सुरेश वाबळे यांचा तर ज्येष्ठ संचालक एन. बी. खांडेकर यांच्या हस्ते एस. एस. गदगे यांचा सत्कार करण्यात आला. तर ताराराणी महिला सहकारी सोसायटीच्या चेअरपर्सन शोभा हरगुडे यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी व्हा. चेअरमन गोपाळराव कातकर, संचालक एम. बी. निर्मळकर, किरण पाटील, संचालिका सुजाता मायानाचे, ताराराणीच्या संचालिका सुधा भातकांडे, मंजुषा पाटील, नवहिंद सहकारी सोसायटीचे चेअरमन उदय जाधव, संचालक सी. बी. पाटील, संभाजी कणबरकर, अधिकारी जोतिबा नांदुरकर, सहय़ाद्री सोसायटीचे सचिव अनिल कणबरकर, सहसचिव मारुती निलजकर व इतर सहकारी उपस्थित होते.

Related Stories

मनपा आयुक्तांच्या सूचनेने शेतकऱयांतून नाराजी

Amit Kulkarni

मंगळवारी पावसाची केवळ रिपरिप

Amit Kulkarni

परदेशात नोकरी देण्याच्या बहाण्याने ‘फसविण्याचे अड्डे’

Amit Kulkarni

ब्लॅक फंगसने जिल्हय़ात 47 जणांचा बळी

Amit Kulkarni

बेळगाव शहरात कोरोनाचा पहिला बळी

Patil_p

नंदगड जेसीएस शाळेच्या विलीनीकरणाला विरोध

Patil_p