Tarun Bharat

सुर्लातील जुन्या पुलाच्या जागी नवीन पुलाची उभारणी होणार भुमिपुजनाने कामाला सुरुवात

प्रतिनिधी / वाळपई

सत्तरी तालुक्मयातील सुरला या कर्नाटक सीमेवरील गावात जाण्यासाठी असलेल्या 40 वर्षापूर्वीचा पुलाची जागा नवीन पूल घेणार आहे. यासाठी जवळपास 47 लाख खर्च करण्यात येणार असून त्याचे भूमिपूजन आज आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या हस्ते ग्रामस्था?च्या मोठय़ा उपस्थित पार पाडण्यात आले.

याप्रसंगी ठाणे पंचायतीच्या सरपंच .प्रजिता गावस,  उपसरपंच सूर्यकांत गावकर, पंच सभासद निलेश परवार, पंच सभासद देवयानी देसाई, लता गावकर सार्वजनिक बांधकाम खात्याचे सहाय्यक अभियंता देवेंद्र वेलींगकर, विनोद शिंदे व इतरांची खास उपस्थिती होती.

सुरला हा गाव जरी कर्नाटकच्या सीमेवर असला तरीसुद्धा गोव्याच्या सर्व सुविधा या गावाला प्रतापसिंह राणे यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या आहेत. या गावांमध्ये कोणत्याही प्रकारची समस्या निर्माण होणार नाही याची विशेष दखल सरकार घेत असून यापूर्वी लाखो रुपये खर्च करून या ठिकाणी पूर्णवेळ वीजपुरवठा उपलब्ध करण्यात आलेले आहे, असे यावेळी आरोग्यमंत्री विश्वजित राणे म्हणाले. यावेळी सरपंच प्रजिता गावस यांनी सर्वांचे स्वागत केले.

दरम्यान या पुलाच्या उभारणीमुळे गावात निर्माण झालेली समस्या दूर होणार आहे. गेल्या तीन वर्षापासून या पुलाच्या मागे पंचायतीची सर्व मंडळी लागली होती. प्रतापसिंह राणे व आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या सहकार्यामुळे या ठिकाणी नवीन पूल उभारण्यात येत आहे, असे स्थानिक पंच सूर्यकांत गावकर म्हणाले. यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याचे कनि÷ अभियंता झिलबाराव देसाई व अरविंद सावईकर यांची उपस्थिती होती.

Related Stories

एसीजीएल विरोधात वाळपईत भव्य मोर्चा

Amit Kulkarni

प्रियोळ मतदारसंघातील प्रत्येक सरकारी शाळा टिकली पाहिजे- मंत्री गोविंद गावडे

Amit Kulkarni

वास्को भाजपाकडून स्वातंत्र्यसैनिक श्रीकांत धारगळकर यांचा सन्मान

Amit Kulkarni

मुंबई-गोवा महामार्गाला 2022 ची डेडलाईन

Patil_p

केरी सातेरी केळबाय आजोबा देवस्थानचे दैनंदिन पुजा अर्चा

Amit Kulkarni

मांद्रे सरपंचावरील अविश्वास ठराव मंजूर

Amit Kulkarni
error: Content is protected !!