Tarun Bharat

सुर्ला ग्रामपंचायत मुख्यमंत्र्यांमुळे प्रगतीच्या दिशेने

पंचायत मंडळाची पत्रकार परिषदेत माहिती

प्रतिनिधी /सांखळी

सांखळी मतदारसंघात सुर्ला ग्रामपंचात पंचायत मंडळाने नुकतीच पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे पंचायतीला चांगले सहकार्य लाभत असल्याची माहिती दिली. या वेळी सरपंच चंद्रकांत घाडी, उपसरपंच अनिता कुंडईकर, सुभाष फोंडेकर, भोला खोडगिणकर, प्रशांत गावकर, सुरेखा खोडगिणकर आणि जिल्हा पंचायत सदस्य गोपाळ सुर्लकर यांची उपस्थिती होती

गावात आवश्यकतेनुसार सरकारी नोकऱया, विविध योजनाचा लाभ मिळवून देणे, नवीन रस्ते, सभागृह, विद्यालय इमारत, पंचायत इमारत इत्यादी सरकारने कामे केली असल्याची माहिती या वेळी दिली. गोव्यातील सामूहिक शेतीचा प्रयोग मुख्यमंत्री सावंत यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी करण्यास पंचायतीला यश आले, सरकारी अधिकारी गावातील लोकांना चांगले सहकार्य देत आहेत. गावात अनेक नवीन प्रकल्प होऊ घातले आहे असेही सांगण्यात आले. खाण बंदीमुळे गावात काही प्रमाणात बेकरीचे प्रमाण वाढले असून याकडेही पंचायत मंडळ गंभियाने पाहत आहे त्यामुळे येणाऱया निवडणुकीत पुन्हा भाजप लाच सत्तेत आणण्याचा विचार पंचायत मंडळानी केला असून नागरिक ही त्यास चांगले सहकार्य देणार असा विश्वासही या पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आला

खूप वर्षांची रस्त्याची मागणी पूर्ण

सुर्ला पंचायत क्षेत्रात बाये येथील मडकईकरवाडा येथील शक्मय नसलेला रस्ता डॉ. प्रमोद सावंत यांनी मध्यस्थी करून पूर्ण केला. यासाठी गोव्यातील पहिला आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बांधलेला साकव आकर्षण ठरत आहे. तसेच या रस्त्यामुळे नागरिकांच्या समस्या सोडवण्यास आम्हाला यश आले अशाही माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली

सुर्ला गावाला सरकारचे पूर्ण सहकार्य

सुर्ला पंचायत क्षेत्रात सरकारचे पूर्ण सहकार्य मिळतं असून वीज, पाणी, शिक्षण, इत्यादी पायाभूत सुविधांचा अभाव कधीही गावातील नागरिकांना जाणवला नाही,  कचरा नियोजन करण्यात ही पंचायत अग्रेसर आहे, यासाठी पंचायतीची स्वातंत्र शेड असून कचरा गोळा करणे, वेगळा करणे यासाठी गावातील बेरोजगार काम करता खासगी क्षेत्रात ही पंचायत खूप प्रगती केल्याचेही या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले

आरोग्य बाबतही नागरिकांत जागृती

सुर्ला पंचायत क्षेत्रातील नागरिकांसाठी आरोग्य बाबतीतही सरकारी अधिकारी चांगले सहकार्य देत असून गावासाठी स्वतंत्र आरोग्य केंद्र असून सोमवारी डॉक्टर येथे गावातील लोकांची आरोग्य तपासणी करतात ,कोरोना काळात ही पोजिटीव आलेल्या नागरिकांची पंचायत मंडळाने खास विचारपूस केली तसेच सांखळी आरोग्य केंद्राचे डॉक्टर आणि नर्सेस घरोघरी जाऊन लोकांची विचारपूस करून योग्य मार्गदर्शन करतात असे ही या पत्रकार परिषदेत सांगण्यात आहे

Related Stories

मडगावात संध्याकाळच्या सत्रात संचारबंदीला चांगला प्रतिसाद

Amit Kulkarni

गोवा : काँग्रेसकडून आलेक्स रेजिनाल्ड यांचा पत्ता कट

Abhijeet Khandekar

मडगाव पालिकेच्या रोजंदारीवरील कामगारांचा कामावर बहिष्कार

Omkar B

लईराईच्या जत्रोत्सवासाठी सोवळे व्रताला प्रारंभ.

Amit Kulkarni

पाच वर्षे फिरकतच नसलेल्या नगरसेवकांना घरी पाठवा : किरण कांदोळकर

Amit Kulkarni

पणजीत इंदिरा गांधींच्या जीवनावर आधारित चित्रपटाचे प्रदर्शन

Amit Kulkarni