Tarun Bharat

सुळगे-येळ्ळूर प्राथमिक शाळेचा होणार अमृतमहोत्सव

प्रतिनिधी /येळ्ळूर

सुळगे-येळ्ळूर येथील प्राथमिक मराठी शाळेला 75 वर्षे पूर्ण होत असल्याने अमृतमहोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बैठक घेवून हा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी ग्राम पंचायतीचे माजी चेअरमन अरविंद पाटील होते.

प्रारंभी मुख्याध्यापिका एस. आय. कुंभार यांनी स्वागत करुन सभेचा उद्देश जाहीर केला. शाळा सुधारणा मंडळाचे अध्यक्ष यल्लाप्पा कणबरकर यांनी शाळेची स्थापना 2 जानेवारी 1947 रोजी झाली आहे. त्यानंतर रौप्य व सुवर्णमहोत्सव साजरा केला होता. आता अमृतमहोत्सव साजरा करायचा असून याबाबत प्रभाकर नावगेकर यांनी नियोजनाची माहिती दिली. यावेळी सीआरपी महेश जळगेकर यांनीही मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाला ग्रामस्थांचे निश्चितच सहकार्य लाभेल. त्यासाठी एक स्मरणीकाही काढण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले आहे. कार्यक्रमाला माजी विद्यार्थी, शिक्षक, आमदार, खासदार तसेच लोकप्रतिनिधींना आमंत्रण देण्याचेही ठरविण्यात आले आहे. याबाबत आतापासूनच जनजागृती करण्याचेही ठरविण्यात आले.

बैठकीला बी. बी. पाटील, मनोहर टक्केकर, राजू कणबरकर, मिनाक्षी भंगेण्णावर, गीता कुकडोळकर, ज्योती पाटील, गीता नावगेकर, मालन पाटील, श्रद्धा कुकडोळकर, नीता पाटील यांच्यासह शिक्षकवर्ग उपस्थित होता.

Related Stories

साईराज चषक वॉर्डनिहाय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

Amit Kulkarni

महाराष्ट्र सरकारविरोधात अभाविप- भाजपचे आंदोलन

Patil_p

बेळगावमधील हॉटेल्सना १ लाख १४ हजार रुपये दंड

Sandeep Gawade

बेळवट्टी-बाकनूर भागात बससेवेचा बोजवारा

Amit Kulkarni

नवरात्रोत्सव काळात धावणार जादा आराम बस

Amit Kulkarni

बेळगाव-वेंगुर्ला मार्गावर कचरा समस्या

Amit Kulkarni