Tarun Bharat

सुळेभावी येथील तरुणाची वडगावात आत्महत्या

प्रतिनिधी/ बेळगाव

दारुचे व्यसन हानीकारक असून ते सोड, असे घरच्यांनी सांगितल्यामुळे नाराज झालेल्या मुळचा सुळेभावी आणि सध्या भारतनगर, वडगाव येथे वास्तव्यास असलेल्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

मंगळवार दि. 25 रोजी रात्री हा प्रकार उघडकीस आला. मारुती गोपाल सोनटक्की (वय 32) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. तो विणकर काम करत होता. काही दिवसांपासून कामाच्या निमित्ताने तो भारतनगर येथे वास्तव्यास होता. घराच्या छताला नायलॉनच्या दोरीने फास लावून त्याने आपले जीवन संपविले आहे. शहापूर पोलिसांत घटनेची नोंद झाली असून उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

Related Stories

विजया ऑर्थो संस्थेतर्फे 50 विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण

Omkar B

विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालयात अत्याधुनिक स्कॅन यंत्र

Amit Kulkarni

बुडा कार्यक्षेत्रात समावेशास गोजगे ग्रामस्थांचा विरोध

Amit Kulkarni

केएलई आयुर्वेदिक कॉलेजमध्ये व्हाईट कोट डे कार्यक्रम

Amit Kulkarni

रायगडावर शिवरायांना मुजरा करून नवदांपत्यांकडून सहजीवनाचा प्रारंभ

Amit Kulkarni

वाढदिनी रक्तदान शिबिराचे आयोजन करून घातला वेगळा आदर्श

Amit Kulkarni