Tarun Bharat

सुवर्णसौधसमोर आंदोलने सुरूच

युवा काँग्रेसच्या मोर्चाला पोलिसांनी अडविले : मोर्चेकरी-पोलिसांमध्ये झटापट : आक्रमक कार्यकर्त्यांना आवरताना पोलिसांची दमछाक

कर्नाटक राज्य युवा काँग्रेसच्यावतीने शुक्रवारी सुवर्ण विधानसौधकडे निघालेल्या मोर्चाला पोलिसांनी अलीकडेच अडविले. यावेळी पोलिसांचे कडे तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न करणारे मोर्चेकरी आणि पोलीस यांच्यामध्ये चांगलीच झटापट झाली. आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांना आवरताना पोलिसांची दमछाक उडाली.

युवा काँग्रेसतर्फे एक तर नोकरी द्या किंवा दरमहा 9 हजार रुपये बेकार भत्ता द्या, या मागणीसाठी हा मोर्चा निघाला. बेळगाव येथील येडियुराप्पा मार्गावरून सुवर्णसौधपर्यंत निघालेल्या या मोर्चामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार, युवा काँग्रेसचे राज्याध्यक्ष रक्षा रामय्या, महम्मद नलपाड, मृणाल हेब्बाळकर यांच्यासह हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

निवडणुकीपूर्वी भाजपने युवकांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्याची पूर्तता केली नाही. त्यामुळे आता सरकारने दरमहा 9 हजार रुपये बेकार भत्ता द्यावा. जर भत्ता देण्यासाठी सरकारकडे पैसे नसतील तर त्यांनी भत्ते घेणे बंद करावे, असे डी. के. शिवकुमार यांनी सांगितले. दरम्यान या मोर्चाला पोलिसांनी सुवर्णविधानसौध अलीकडेच अडविले. तेव्हा पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार झटापट झाली.

कार्यकर्त्यांनी पोलिसांचे कडे तोडण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला. त्यातच काही जणांनी रस्त्यावरच ठाण मांडले. मोदी हटाव, राहुल गांधी झिंदाबाद, अशा घोषणांनी कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. दरम्यान कार्यकर्ते आक्रमक होताच काँग्रेसचे नेते सतीश जारकीहोळी, लक्ष्मण चिंगळे यांच्यासह अनेक नेते आंदोलनस्थळी दाखल झाले. बराचवेळ निदर्शने करून मोर्चेकरी परतले.

राज्यातील अतिथी प्राध्यापकांना नोकरीत कायम करा : सुवर्णसौधसमोर प्राध्यापकांचे आंदोलन

राज्यात सरकारी प्रथम दर्जा कॉलेजमध्ये मागील 8 ते 10 वर्षांपासून अतिथी प्राध्यापक तुटपुंज्या पगारावर सेवा बजावित आहेत. इतर राज्यांनी अतिथी प्राध्यापकांना नोकरीत कायम केले आहे. परंतु कर्नाटकात अतिथी प्राध्यापक अद्याप वंचित आहेत. वेतन कमी असल्याने कुटुंबीयांचे हाल होत असून नोकरीत कायम करण्याची मागणी कर्नाटक राज्य प्रथमवर्ग कॉलेज अतिथी प्राध्यापक संघटनेच्यावतीने राज्य सरकारकडे करण्यात आली.

सुवर्णसौधसमोर आंदोलन करून अतिथी प्राध्यापकांनी आपल्या मागण्या मांडल्या. राज्यातील 430 सरकारी प्रथम दर्जा कॉलेजमध्ये 14 हजार अतिथी प्राध्यापक सेवा बजावत आहेत. मागील 8 ते 10 वर्षांपासून तुटपुंज्या वेतनावर काम सुरू आहे. त्यामुळे आता तरी राज्य सरकारने अतिथी प्राध्यापकांकडे लक्ष देऊन त्यांना नोकरीत कायम करावे, अशी मागणी संघटनेच्यावतीने करण्यात आली.

Related Stories

दूधसागरनजीक रेल्वेवर कोसळली दरड

Omkar B

शहरातील भटकी जनावरे पकडण्याची मोहीम

Patil_p

मुख्यमंत्रिपदी बोम्माई शपथबद्ध

Patil_p

खानापूर भाजप युवा संघटना-बजरंग दलातर्फे कोरोना बळीवर अंत्यसंस्कार

Amit Kulkarni

शिक्षक बदलीसाठी जिल्हय़ात 2 हजार 927 अर्ज

Patil_p

आंतरराज्य बससेवा पूर्ववत सुरू

Amit Kulkarni