Tarun Bharat

सुवर्ण खजिना असणारे रहस्यमय पर्वत

खजिना शोधण्यास गेलेले परतलेच नाहीत

जग असंख्य रहस्यांनी भरलेले आहे, या रहस्यांची उकल आतापर्यंत कुणीच करू शकलेले नाही. या रहस्यांची उकल करण्याचा प्रयत्न वैज्ञानिक आणि संशोधकांनी कित्येकदा केला, पण त्यांना यश मिळू शकले नाही. वैज्ञानिक किंवा संशोधक देखील या रहस्यांची उकल करण्याच्या प्रयत्नात त्यात अधिकच अडकून पडतात. असेच एक रहस्यमय ठिकाण अमेरिकेत आहे. ऐरिझोनाच्या सुपरस्टीशन पर्वतरांगा आज देखील लोकांसाठी रहस्य आहेत.

तेथे द  लॉसट डचमॅन गोल्ड माइनमध्ये सोन्याच्या खाणी आहेत, पण तेथे जो गेला तो कधीच परतला नाही. या रहस्याची उकल आतापर्यंत झालेली नाही. अमेरिकेच्या ऐरिझोनाच्या सुपरस्टीशन पर्वतरांगेत ‘गूढ’ सुवर्ण खजिना आहे. अनेक लोक सोन्याच्या शोधात तेथे गेले. हे लोक तेथे भटकत राहिले आणि त्यांना खजिना मिळू शकला नाही. तसेच ते कधी परतले देखील नसल्याचे सांगण्यात येते.

या भागात अंग भाजून काढणारी उष्णता आणि गोठवून टाकणारी थंडी पडते. येथे येणारा व्यक्ती या प्रतिकूल हवामान तग धरू शकत नाही. पण सोन्याच्या शोधात लोकांचे येणे सुरूच राहिल्याने प्रशासनाने तेथे जाण्यावर बंदी घातली आहे.

एरिझोनाच्या सुपरस्टीशन पर्वतरांगेत खाणकाम करणे अवैध आहे. सोने सापडल्यास ते सरकारी खजिन्यात जमा करावे लागते. तरीही लोक तेथे सोन्याचा शोध घेण्यासाठी जातात आणि जीव गमावून बसतात. या लोकांचे मृतदेह पोलिसांनी हस्तगत केल्याचे सांगण्यात येते.

एरिझोनाच्या धोकादायक पर्वतांमध्ये एकदा हरवून बसल्यावर जिवंत परतणे अवघड आहे. तसेही या पर्वतीय क्षेत्रात भीषण उष्णता आणि गोठवून टाकणारी थंडी पडत असते. येथील उष्णता आणि थंडी सहन करणे लोकांसाठी अवघड आहे. अशा हवामानात एखादा व्यक्ती या पर्वतीय क्षेत्रात गायब झाल्यास तो वाचणे कठिण आहे.

प्रवेशास मज्जाव

सोन्याच्या शोधात पर्वतांवर जाणाऱया लोकांच्या मृत्यूनंतर प्रशासनाने तेथील प्रवेशास मज्जाव केला आहे. सोन्याच्या खजिन्याच्या शोधत येथे गेलेल्या अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. याचमुळे तेथे सोन्याच्या खाणकामाला अवैध घोषित करण्यात आले आहे. तेथे सोन्याचे तुकडे काही लोकांना सापडले आहेत, पण खाणीचा अद्याप शोध लागलेला नाही.

Related Stories

निवडणूकपूर्व सर्वेक्षणात ज्यो बिडेन आघाडीवर

Patil_p

हिंदूंवर हल्ला करू पाहणारा बांगलादेशी दहशतवादी जेरबंद

Omkar B

100 वर्षांची पॉवरलिफ्टर

Patil_p

हुतात्म्यांना माजी सैनिकाचा अनोखा सलाम

Patil_p

हाफिझ सईदसह सहाजण दोषमुक्त

Patil_p

सर्वात उंच महिलेचा पहिला विमानप्रवास

Patil_p