Tarun Bharat

सुवेंदूंच्या बालेकिल्ल्यात ममता लढवणार निवडणूक

ऑनलाईन टीम / भोपाळ : 

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारणाला रंग आला आहे. नंदीग्रामचे आमदार असलेले सुवेंदू अधिकारी यांनी काही दिवसांपूर्वीच तृणमूल काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या विरोधात चक्क पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी आज जाहीर केले. 

ममता म्हणाल्या, मी नंदीग्रामच्या जागेवरून निवडणूक लढवेन. शक्य झाल्यास भवानीपूर आणि नंदीग्राम या दोन्ही ठिकाणाहून निवडणूक लढवेन. यावेळीही तृणमूल काँग्रेसचे सरकार बंगालमध्ये असेल आणि तृणमूलला 200 पेक्षा जास्त जागा मिळतील. सुवेंदू अधिकारी यांचा बालेकिल्ला असलेल्या नंदीग्राममध्ये रॅली काढताना बॅनर्जी यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. 

ममता बॅनर्जी आणि सुवेंदू दोघेही एकमेकांच्या गढीत प्रचार करत आहेत. ममता नंदीग्राममध्ये रॅली करत आहेत. सुवेंदू अधिकारी दक्षिण बंगालमध्ये रोड शो आयोजित करतील. ममतांना बंगालची सत्ता मिळवून देण्यात नंदीग्रामने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 

Related Stories

सर्वोच्च न्यायालयात नवा रोस्टर अंमलात

Patil_p

हजार विमानोड्डाणे हिमवादळामुळे रद्द

Patil_p

लघू-मध्यम उद्योजकांसाठी ऍमेझॉन निधी उभारणार

Patil_p

मेन्यूकार्डातून समजणार खाद्यपदार्थातील उष्माक

Patil_p

चीनवर चहुबाजूने होणार वार, क्वाडचा युद्धाभ्यास

Patil_p

तेलंगणा : भूमिगत हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर स्टेशनमध्ये भीषण आग

datta jadhav