Tarun Bharat

सुशांत आत्महत्या : सुप्रीम कोर्टाच्या निकालावर संजय राऊत म्हणाले…

Advertisements

ऑनलाईन टीम / मुंबई :


सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास आता सीबीआयकडे सोपविण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने मुंबई पोलिसांना दिले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.


ते म्हणाले, या प्रकरणावर राजकीय प्रतिक्रिया देणे योग्य नाही. ही कायदेशीर बाब आहे. न्यायालयाच्या अखत्यारीत असल्याने महाराष्ट्रचे महाधिवक्ता, मुंबई पोलीस आयुक्त यांनी बोलणे योग्य आहे. महाराष्ट्र हे कायद्याचे राज्य आहे. न्याय आणि सत्य यासाठी संघर्ष करणारे राज्य आहे. इथे कधी अन्याय झाला नाही. त्यामुळे संपूर्ण निकालपत्र हाती आल्याशिवाय मत व्यक्त करणे योग्य नाही.


पुढे ते म्हणाले, मुंबई पोलिसांनी त्यांचा तपास अत्यंत प्रामाणिकपणे केला आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उभे करणे हे एक षडयंत्र आहे. मुंबई पोलिसांची जगभरात प्रतिष्ठा आहे. तरीदेखील आपल्याच राज्यातील नेते मुंबई पोलिसांना बदनाम करत आहेत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट म्हटले. 

Related Stories

2014 ते 2029 कालावधी अत्याधिक महत्वाचा

Omkar B

राज्यातील ६०८ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान; कोल्हापुरात एकमेव ग्रामपंचायतीत मतदान

Archana Banage

कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यावर बंदी घालण्याची गरज नव्हती : मनमोहन सिंग

prashant_c

रशियाला मदत केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अमेरिकेचा चीनला इशारा

Archana Banage

इचलकरंजीतील एसटी कर्मचाऱ्याचा मुंबईत मृत्यू

Archana Banage

उद्या टास्क फोर्सच्या बैठकीत लॉकडाऊनचा अंतिम निर्णय : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Tousif Mujawar
error: Content is protected !!