Tarun Bharat

सुशांत आत्महत्या : CBI कडून रिया चक्रवर्तीची 10 तास चौकशी

  • आजही चौकशीची होण्याची शक्यता

ऑनलाईन टीम / मुंबई : 


सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणी रिया चक्रवर्तीची सीबीआयने शुक्रवारी तब्बल 10 तास चौकशी केली. सीबीआय अधिकारी नीरज प्रसाद यांनी रियावर प्रश्नांची सरबत्ती केली. मात्र, रियाने दिलेल्या माहितीवर चौकशी पथकाचे समाधान झाले नाही. त्यामुळे आज पुन्हा एकदा रियाला चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता आहे. 


काल सकाळी रियाची सीबीआय ऑफिसमध्ये सकाळी 11 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत अशी तब्बल 10 तास रियाची चौकशी सुरू होती. 9 वाजण्याच्या सुमाराला रिया सीबीआय ऑफिसमधून निघाली. तर दुसरीकडे डीआरडीओ गेस्ट हाऊसवर रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती, सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिठानी, कूक नीरज, रजत मेवाती, सॅम्युअल मिरांडा यांचीही चौकशी करण्यात आली. 

अभिनेता सुशांतच्या संपर्कात रिया कशी आली हा प्रश्न सीबीआयकडून रियाला विचारण्यात आला. त्यानंतर तिने सुशांतसोबत डेटिंग करणे कधी सुरू केले. त्या दोघांच नातं कसे होते. यासारखे प्रश्न रियाला विचारण्यात आले. 


दरम्यान, चौकशीनंतर घरी परतताना सांताक्रुज पोलीस ठाण्यामध्ये काही तक्रार करून ती घरी गेली. मात्र, रियावर लावण्यात आलेले आरोप सिद्ध झाल्यास तिला कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.

Related Stories

कोल्हापूर : कापशीतील अपहरण झालेल्या ‘त्या’ चिमुकल्याचा मृतदेह सापडला

Archana Banage

अमेरिकेत कोरोनाबाधितांनी ओलांडला 25 लाखाचा टप्पा

datta jadhav

वांगी येथे शेतकऱ्यांचा महावितरण विरोधात रास्तारोको

Archana Banage

भाजप अध्यक्षांचा कार्यकाल वाढला, आगामी लोकसभा निवडणुका नड्डांच्या नेतृत्वात लढवणार-अमित शहा

Archana Banage

अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष निवडणुकीसाठी पहिली डिबेट 29 सप्टेंबरला

datta jadhav

काँग्रेस नेते कमलनाथ यांची प्रकृती बिघडली

Patil_p