Tarun Bharat

सुशांत सिंह प्रकरणात सत्य बाहेर येईल

Advertisements

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे सूतोवाच

प्रतिनिधी/ सातारा

मुंबई पोलिसांवर माझा विश्वास आहे. मी मुख्यमंत्री असताना त्यांच्याबरोबर काम केले आहे. अभिनेता सुशांत सिंह प्रकरणात मुंबई पोलिसांनी कारवाई केली नाही, त्यांच्यावर कोणाचा तरी दबाव आला असावा. राज्यातील सरकारने याबाबत खुलासा केला पाहिजे, असे माजी मुख्यमंत्री, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

नामदार देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथील कृष्णा रूग्णालयास भेट देऊन कोविड सेंटरची पाहणी केली. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अतुल भोसले, कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, शेखर चरेगावकर, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर उपस्थित होते.

सुशांत सिंह प्रकरण ज्यावेळी मुंबई पोलिसांकडे होते, त्यावेळी पुरावे मिळाले नाहीत. मात्र सीबीआयकडे गेल्यानंतर पुरावे येऊ लागले आहेत. जनतेच्या मनात या प्रकरणावरून शंका आहे. मध्यमवर्गातून येऊन बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण करणाऱया सुशांत सिंहच्या मृत्यूबाबत संशय निर्माण झाला आहे. लोकांना याविषयी राजकारण नव्हे तर सत्य हवे आहे. ते आता बाहेर येत आहे. मुंबई पोलिसांकडे तपास असताना पुरावे का सापडले नाहीत, याचाही खुलासा सरकारला करावा लागेल, असे फडणवीस म्हणाले.

कोरोना महामारीच्या काळात कृष्णा हॉस्पिटलने चांगले काम केले आहे. 1 हजारपेक्षा जास्त रूग्ण बरे केले आहेत. 1400 जणांवर उपचार सुरू आहेत. येथे पहिल्यापासून सर्व पायाभूत सुविधा आहेत. कराड हे हॉटस्पॉट असून सर्वाधिक रूग्ण येथे आहेत. त्यामुळे पुढचे काही दिवस शासनाने येथे लक्ष द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली. कृष्णा रूग्णालयाने उपचार चांगले केले असले तरी अद्याप शासनाने त्यांना सहकार्य करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. महात्मा फुले आरोग्य योजनेचे दावे लवकरात लवकर करून रूग्णालयांना पैसे मिळवून द्यावेत, असे ते म्हणाले. जीएसटीच्या प्रश्नावर बोलताना महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचा कारभार खोटे बोल पण रेटून बोल, असा असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

Related Stories

सातारा : ठेकेदाराच्या आडमुठ्या धोरणामुळे औंध रस्त्याचे काम बंद पाडले

Abhijeet Shinde

बारावीचा ‘तो’ पेपर फुटला नाही

datta jadhav

सातारा : पालिकेच्या अतिक्रमण विभागाने मटक्याची टपरी हटवली

datta jadhav

…अन्यथा लॅबची मान्यता रद्द करणार

datta jadhav

Assembly Speaker Election Live Update : शिंदे गटाचा शिवसेनेला धक्का,राहुल नार्वेकर बहुमतांनी विजयी

Abhijeet Khandekar

कोयनेच्या पायथा वीजगृहातून विसर्ग

Patil_p
error: Content is protected !!