Tarun Bharat

सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या नावावर भाजपला बिहार निवडणूक लढवायची होती – नवाब मलिक


मुंबई \ ऑनलाईन टीम

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूला एक वर्ष पूर्ण झाले आहे. मात्र अद्यापही त्याच्या मृत्यूचं गूढ कायमच आहे. सुशांतने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली? हा प्रश्न अद्याप अनुत्तरीतच आहे. कारण, सुशांतची आत्महत्या ही हत्या असल्याचा दावा अनेकांनी केला आहे. सीबीआयने चौकशी करुनही अद्याप स्पष्ट कारण दिलं नसल्याने राष्ट्रवादीने भाजपवर निशाणा साधला आहे. सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या नव्हती तर हत्यारा कोण हे सीबीआयनं सांगितले पाहिजे. महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्यासाठी आणि निवडणूक लढवण्यसाठी सीबीआयला पुढे करण्यात आले होते, आसा आरोप राष्ट्रवादी नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

नवाब मलिक म्हणाले की, सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येचा तपास मुंबई पोलीस करत असतानाच राजकीय कारणामुळे या प्रकरणाचा गुन्हा बिहार सरकारने दाखल केला व ही केस सीबीआयकडे दिली होती परंतु निष्पन्न काय झालं असा सवालही नवाब मलिक यांनी केला आहे. एक वर्षानंतर सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येचा तपास झालेला नाही त्यामुळे त्याची आत्महत्या नव्हती तर त्याचा हत्यारा कोण हे सीबीआयने जनतेला सांगितले पाहिजे अशी मागणीही नवाब मलिक यांनी केली आहे.


सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येच्या नावावर भाजपला बिहार निवडणूक लढवायची होती म्हणून सीबीआयला पुढे करुन महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्याचे कटकारस्थान रचण्यात आले होते असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी यावेळी केला आह

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूला एक वर्ष पूर्ण झाले आहे. १४ जून २०२० मध्ये सुशांतने त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. सुशांतचे असे अकाली जाणे चाहत्यांना चटका लावून गेले. सुशांतच्या पहिल्या मृत्यूदिनी त्यांचा चित्रपट करिअरचा प्रवास उलगडणारी एक वेबसाईट लॉंच करण्यात आली आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून चाहत्यांना त्याच्याविषयी प्रत्येक लहान मोठी गोष्ट फक्त एका क्लिकवर जाणून घेता येणार आहे. या वेबसाइटचे नाव www.ImmortalSushant.com असे आहे.

Related Stories

बीएमटीसीच्या बेंगळूरमध्ये ९० इलेक्ट्रिक बसेस धावणार

Archana Banage

शिवजयंतीसाठी ठाकरे सरकारकडून नियमावली जाहीर

Tousif Mujawar

…तर मोदींचे अस्तित्व केव्हाच संपले असते

datta jadhav

अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमा प्रथमच भक्तांविना

Archana Banage

2 कोटीपेक्षा अधिक कोरोना टेस्ट करणारे देशातील पाहिले राज्य ठरले ‘उत्तर प्रदेश’

Tousif Mujawar

आडत व्यापारी करणार आजपासून विक्री बंद

Patil_p