Tarun Bharat

सुस्ते येथे बेकायदेशीररित्या अफुच्या शेतीची लागवड

Advertisements

पंढरपूर तालुका पोलिसांची कारवाई : अफूची 562 रोपे पोलिसांकडून जप्त

पंढरपूर / प्रतिनिधी

बेकायदेशीररित्या ऊस व मका पिकामध्ये अफुंच्या रोपांची लागवड केल्याप्रकरणी पंढरपूर तालुक्यातील सुस्ते (चोरमळा वस्ती) येथील तानाजी रावसाहेब जाधव याच्याावरती तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे. कारवाईत 29 हजार 511 रुपये किंमतीची 562 अफूची रोपे (बोंडासहित) जप्त करण्यात आली असून आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. सदरची कारवाई शनिवार दि. 4 मार्च रोजी करण्यात आली आहे.

   याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार, पंढरपूर तालुक्यातील सुस्ते येथील चोरमळा येथे ऊस व मका पिकांच्या अंतर्गत अफुंच्या रोपांची लागवड केल्याचे बातमीदारामार्फत पोलिसांना समजले होते. ऊस व मका पिकात तानाजी जाधव याने अफूच्या रोपांची लागवड केली होती. यामध्ये सरकारी पंचाच्या समक्ष पोलिसांनी अफूची रोपे व बोंडे जप्त केली आहेत. अफूच्या रोपांचे व बोंडांचे वजनकाटयावरती वजन करुन इतर ठिकाणीही पोलिसांनी पाहणी केली. आरोपीस अटक करण्या आली असून त्यास न्यायालयासमोर हजर केले आहे.

Related Stories

सोलापूर जिल्ह्यात कोरोना लसीचे प्रशिक्षण देण्याच्या सूचना

Abhijeet Shinde

मठाधिपती पिसाळांवर लवंडमाचीत अंत्यसंस्कार

Abhijeet Shinde

सोलापूर ग्रामीणमध्ये 214 कोरोना पॉझिटीव्ह तर 9 जणांचा मृत्यू

Abhijeet Shinde

उस्मानाबाद : लाच स्वीकारताना महावितरणच्या प्रतिनिधीसह साथीदारास अटक

Abhijeet Shinde

पालकमंत्री दत्तात्रय भरणे उद्यापासून तीन दिवस सोलापूर दौऱ्यावर

Abhijeet Shinde

वाळू तस्करावर कारवाई, 21 लाखांचा मुद्देमाल जप्त

Abhijeet Shinde
error: Content is protected !!