Tarun Bharat

सुस्त, गलथान कारभारामुळे कोलवाळ तुरुंगात कैद्याचा मृत्यू

प्रतिनिधी/ पणजी

कोलवाळ येथील गोवा मध्यवर्ती तुरुंगात शैलेश मापारी या कैद्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शैलेश मापारी याच्या छातीत कळा येत होत्या, त्याला त्रास होत असल्याचे त्याने तुरुंग अधिकाऱयांना सांगितले होते. मात्र तुरुंगातील सुस्त, गलथान कारभारामुळे त्याच्यावर वेळीच उपचार होऊ शकले नाही आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. या साऱया प्रकारामुळे तुरुंगातील इतर कैद्यांनी संताप व्यक्त केला असून त्यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. तुरुंगात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या काही वर्षापूर्वी अस्नोडा येथे झालेल्या खून प्रकरणात शैलेश मापारीला न्यायालयाने दोषी ठरवला होता. गेल्या 15 वर्षापासून तो तुरुंगात शिक्षा भोगत होता. 20 रोजी रविवारी रात्री त्याच्या छातीत दुखू लागले होते. त्याने तुरुंग कर्मचाऱयांना कळविलेही होते.

रुग्णवाहिका आत घ्यायची की नाही?

रविवार असल्याने त्याच्याकडे कुणीही गांर्भीयाने पाहिले नाही. दुसऱया दिवशी सोमवारी त्याच्या दुखण्यात वाढ झाली. त्याला इस्पितळात नेण्यासाठी तुरुंग कर्मचाऱयांनी रुग्णवाहिका बोलावली, मात्र रुग्णवाहिका तुरुंगाच्या मुख्य गेटमधून आत घ्यायची की नाही, याच्यावरच निर्णय व्हायला वेळ लागला, आणि परिणामी आजारी कैद्याचा मृत्यू झाला.

परवानगी द्यायला लागला एक तास

तुरुंगाच्या मुख्य गेटवर आयआरबी पोलीस तसेच तुरुंग कर्मचारी पहारा देत असतात. रुग्णवाहिका आत न्यायची असल्यास तुरुंग अधिकाऱयांकडून तसे पत्र आणा, असे आयआरबी पोलिसांनी बजाविले होते. तुरुंग अधिकाऱयांनी पत्र देण्यास खूपच उशीर केला. त्यामुळे कैदी रुग्ण त्याच स्थितीत राहिला. त्याच्यावर उपचार होऊ शकले नाही. एक तासानंतर त्याचा मृत्यू झाला.

कोलवाळ तुरुंगापासून म्हापसा आझिलो इस्पितळ अवघ्या काही अंतरावर आहे. वेळीच त्याला इस्पितळात दाखल केले असते तर कदाचित शैलेश मापारी याच जीव वाचू शकला असता. तुरुंग कर्मचाऱयांच्या या गचाळ कारभारामुळे तुरुंगातील इतर कैद्यांनी नाराजी व्यक्त केली असून त्यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. तुरुंगात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Stories

शनिवारी तब्बल 280 नवे कोरोनाबाधित रुग्ण

Patil_p

आदर्श ग्रामातील 22 व्या लोकोत्सवाचे शानदार उद्घाटन

Amit Kulkarni

काँग्रेसचे योगदान समजण्यासाठी भारताचा इतिहास नीट शिकावा

Amit Kulkarni

अदानींच्या फायद्यासाठी गोव्याच्या नैसर्गिक स्रोतांचा बळी

Patil_p

भारत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमांना सुरुवात

Patil_p

भगतसिंह कोश्यारी यांनी स्वीकारली गोव्याच्या राज्यपालपदाची सूत्रे

datta jadhav