Tarun Bharat

सुस्थितीतील रस्त्यांचा विकास करण्याचा सपाटा

प्रतिनिधी / बेळगाव

शहरातील काही रस्त्याची दुरवस्था झाली असून रस्त्यांची दुरूस्ती करण्याची मागणी होत आहे. मात्र आवश्यक नसलेल्या आणि सुस्थितीत असलेल्या रस्त्याचा विकास करण्याचा सपाटा गुडस्शेड रोड परिसरात सुरू आहे. गुडस्शेड क्रॉस क्रमांक 4 आणि 5 येथील सुस्थितीत असलेल्या रस्त्याची खोदाई करून पेव्हर्स घालण्यात येत आहेत.

बहुतांश रस्ते खराब झाले असून खड्डय़ांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. स्मार्टसिटी योजनेअंतर्गत काही ठराविक भागातील रस्त्याचा विकास करण्यात येत आहे. पण एकदम खराब झालेल्या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी स्मार्टसिटीत समावेश करण्यात आले नाही. परिणामी खराब रस्ते विकासापासून वंचित आहेत. खराब आणि खड्डेमय रस्त्यावरून ये-जा करणे नागरिकांना त्रासदायक ठरत आहे. वाहनधारकांना असंख्य अडचणांमधून मार्ग काढावे लागत आहेत. मागणी करूनही रस्ता दुरूस्तीचे काम महापालिकेकडून झाले नाही. मात्र वर्षभरापूर्वी केमलेल्या गुडस्शेड रोड परिसरातील रस्त्याचा विकास करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. येथील क्रॉस क्रमांक 4 आणि 5 चा रस्ता सुस्थितीत असताना देखील खोदून नव्याने केला आहे. डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर पेव्हर्स घालण्यात येत आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या कारभाराबाबत सखेद आश्चर्य व्यक्त हेत आहे. रस्त्याच्या विकासाची मागणी सातत्याने करूनही दुर्लक्ष करण्यात येत आहे. तसेच गरज असलेल्या रस्त्याची दुरूस्ती करण्याकडे कानाडोळा करण्यात येत आहे. मात्र सुस्थितीत रस्त्यावर पेव्हर्स घालून काय साध्य करणार असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. स्मार्टसिटी योजनेतील निधीचा योग्य वापर करावा तसेच निधीचा दुरूपयोग टाळून आवश्यक रस्त्याचा विकास करण्याची मागणी होत आहे.

Related Stories

उद्यमबाग येथील ईएसआय क्लिनिक कुचकामी

Amit Kulkarni

मित्रानेच काढला ज्योतिषाचा काटा

Patil_p

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा सुवर्णसौधवर 22 रोजी मोर्चा

Patil_p

बस जाग्यावर… परिवहनला फटका

Amit Kulkarni

बसवन कुडची येथील विद्युतवाहिन्यांची उंची वाढविली

Amit Kulkarni

आधारमधील चुकांच्या दुरुस्तीसाठी जादाची रक्कम वसूल करण्याचा सपाटा

Patil_p
error: Content is protected !!