Tarun Bharat

सुस्थितीत असलेल्या रस्त्याची खोदाई

रहिवासी-वाहनधारकांकडून नाराजी : महाद्वाररोड दुसरा क्रॉस येथील रस्त्याची दुरवस्था, वाहनधारकांची गैरसोय

प्रतिनिधी /बेळगाव

महाद्वाररोड दुसरा क्रॉस येथील रस्त्याचा विकास करून पेव्हर्स घालण्यात आले होते. मात्र आता सुस्थितीत असलेला रस्ता खोदण्यात आला असून रस्त्याची दुरवस्था झाली आहे. टेलिफोन वाहिनीच्या दुरुस्तीसाठी खोदाई करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. पण रस्ता खराब झाल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

महाद्वाररोड मुख्य रस्त्याचे रुंदीकरण करून डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र चार महिन्यातच डेनेज वाहिन्या घालण्यासाठी रस्त्याची खोदाई करण्यात आल्याने संपूर्ण रस्ता खराब झाला आहे. रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली. पण त्यानंतर पुन्हा खड्डे निर्माण झाले असून, संपूर्ण रस्ता खड्डेमय बनला आहे. या रस्त्याची डागडुजी करणे गरजेचे असतानाच आता दुसरा क्रॉस येथील रस्ता खोदण्यात आला आहे.

रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी

या रस्त्याची खोदाई करून वर्षभरापासून दुरूस्ती करण्यात आली नव्हती. नागरिकांच्या पाठपुराव्यानंतर रस्त्यावर पेव्हर्स घालून दुसरा क्रॉस येथील रस्ता सुसज्ज करण्यात आला होता. मात्र आता हा रस्ता पुन्हा खोदण्यात आला आहे. एकीकडे रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी नसल्याचे सांगून कानाडोळा करण्यात आला आहे. दुसरीकडे सुस्थितीत असलेले रस्ते विविध कारणास्तव खोदण्याचा प्रकार सुरू आहे. त्यामुळे रहिवासी आणि वाहनधारकांची गैरसोय होत आहे. महाद्वाररोड दुसरा क्रॉस येथील रस्ता खोदण्यात आल्याने वाहनधारकांना ये-जा करणे मुश्कील बनले आहे. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती तातडीने करण्यात यावी, अशी मागणी येथील नागरिकांतून होत आहे.

Related Stories

शिवपुतळा विटंबनेचा जांबोटीत तीव्र निषेध

Amit Kulkarni

धाक दाखवून व्यापाऱयाला पावणेतीन लाखाला लुटले

Patil_p

गोकाकच्या नगराध्यक्षपदी जयानंद हुनश्याळ

Patil_p

नाईट पार्किंगसाठी दुसरे विमान होणार दाखल

Patil_p

तहसिलदार कार्यालयातील उतारा केंद्र बंद, सर्वसामान्यांचे हाल

Patil_p

थेट बांधावरच अधिकाऱयांचे शेतकऱयांना मार्गदर्शन

Patil_p