Tarun Bharat

सून संतापी आहे… काय करु?

मी 68 वर्षांची महिला असून मला दोन मुलं आणि एक गोंडस नातू आहे. माझ्या मोठय़ा सुनेचा स्वभाव तापट असल्यामुळे ती या लहानग्यावर राग काढते. त्याच्यावर हात उगारते. आजीआजोबांचा त्यांच्या नातवंडांवर खूप जीव असतो आणि याचाच फायदा घेण्याचा तिचा प्रयत्न असतो. मित्रमैत्रिणींना घरी बोलवून रात्री उशीरा पार्टी करणं, स्तनपान करवण्याच्या काळात मद्यपान करणं अशा अत्यंत चुकीच्या  गोष्टी ती करत असते. आम्ही तिला समजावण्याचा प्रयत्न करतो. पण यामुळे ती खूप चिडते. आम्हाला अपशब्द सुनावते. इतकंच नाही तर तिच्या लहानग्या बाळालाही मारते. याचा आम्हाला खूप त्रास होतो. आम्ही तिच्या पालकांना सांगण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनीही तिचीच बाजू घेत आम्हाला दोष दिला. आमचा नातू आईला खूप घाबरतो. या परिस्थितीत मी काय करू?  – या प्रकाराबाबत तुम्ही तुमच्या मुलाशी बोललात का? बोलला नसाल तर त्यालाही या प्रकरणात लक्ष घालायला सांगा. अशा प्रकारच्या हिंसेचा मुलांच्या मनावर वाईट परिणाम होऊ शकतो. हिंसा योग्य असल्याचं त्यांच्या मनावर ठसू शकतं. त्यामुळे तुमच्या मुलाने त्याच्या पत्नीशी बोलायला हवं. तुम्हीही तुमच्या सुनेला विश्वासात घ्या. कोणतीही आई आपल्या लहान बाळाशी वाईट वागू शकत नाही. त्यामुळे तिच्या अशा वागण्याचं कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तिला काही ताण असू शकतो. आई झाल्यानंतर आलेली नवी जबाबदारी हाताळताना तिची ओढाताण होऊ शकते. तिला मार्गदर्शनाची, समुपदेशनाची किंवा समजून घेण्याची गरज असू शकते. बर्याच महिलांना प्रसूतीनंतर नैराश्य येतं. ही बाब गांभीर्याने घ्यायला हवी. या सगळ्या शक्यता पडताळून पहा. आपल्या मुलाला वाढवण्याबाबतची तिची काही मतं असू शकतात. विचारधारा असू शकते. पण तुमचा नातू आईला घाबरत असेल तर मुलाशी बोला आणि समुपदेशकांची मदत घेऊन यावर मार्ग काढा.

Related Stories

ताशीचा जिद्दीला सलाम

Amit Kulkarni

युथफुल दिसण्यासाठी…

Omkar B

पुन्हा जगू नव्याने.

Omkar B

लागवड टामॅटोची

Omkar B

अशी असावी सलवार कमीज

Amit Kulkarni

स्वतःसाठी वेळ मिळाला !

Omkar B
error: Content is protected !!