Tarun Bharat

सूरतच्या दुकानात मिळतोय ‘बचपन का प्यार’

580 रुपयांमध्ये एक किलो उपलब्ध

‘बचपन का प्यार’ मिळवू इच्छिता का? तर गुजरातच्या सूरतमधील एका मिठाईच्या दुकानात पोहोचा. तेथे 580 रुपये प्रतिकिलोच्या दराने ‘बचपन का प्यार’ विकला जातोय. या दुकाने लोकांच्या ‘बालपणीच्या आठवणी’ जागविण्याच्या उद्देशाने एक विशेष मिठाई तयार केली असून त्याला ‘बचपन का प्यार’ हे नाव दिले आहे. तसेही सध्या छत्तीसगडमधील सहदेव या मुलाने गायलेले ‘बचपन का प्यार’ हे गाणे चर्चेत आहे.

या दुकानाचे नाव 24 कॅरेट्स असून राधा मिठाईवाला याच्या संचालिका आहेत. रक्षाबंधनाकरता आम्ही भावाबहिणींच्या आठवणी जागविण्याच्या हेतूने या मिठाईला हे नाव दिले आहे. केवळ मिठाईचे नावच नव्हे तर त्याचा स्वादही अत्यंत विशेष असल्याचे त्या सांगतात.

या मिठाईमध्ये बबलगम फेल्वरचा वापर करण्यात आला आहे, जो काही काळापूर्वी मुलांचा अत्यंत आवडीचा असायचा. दुकानदाराने बालपणीची आठवण यावी असा प्रयत्न यातून केला आहे. ही मिठाई स्टोअरमध्ये 580 रुपये प्रतिकिलो दराने विकली जात आहे.

काही दिवसांपूर्वी छत्तीसगडमधील एका विद्यार्थ्याचा (सहदेव दिरदो) व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओत तो वर्गात ‘बचपन का प्यार’ हे गाणे गाताना दिसून येतो. या व्हिडिओने मोठी प्रसिद्धी मिळविली आहे.

Related Stories

‘सर्जिकल स्ट्राईक’चा देशाला अभिमान!

Amit Kulkarni

काँग्रेस सदस्य नाही, अशी पहिलीच वेळ

Patil_p

ओडिशामध्ये वायूगळती, 4 मजुरांनी गमावला जीव

Omkar B

तिहार तुरुंगात कैद्याची आत्महत्या

Patil_p

ममता बॅनर्जींना उच्च न्यायालयाकडून 5 लाखांचा दंड

datta jadhav

‘लस हवी असेल, तर आत्मनिर्भर व्हा’

Patil_p