Tarun Bharat

सॅटेलाईट फोटोमुळे चीनचा खोटेपणा उघड

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 
भारताने गलवान खोऱ्यात नियंत्रण रेषा ओलांडून चिनी सैन्यांवर हल्ला केल्याचा कांगावा करणारा चीन आता उघडा पडला आहे. 16 जून रोजी घेण्यात आलेल्या सॅटेलाईट फोटोंनुसार चीनने हल्ल्याचा पूर्वनियोजित कट रचल्याचे स्पष्ट होत आहे.

लडाख सीमेवर मागील आठवड्यात चिनी सैनिकांच्या फारशा हालचाली नव्हत्या. मात्र, 15 जूनपूर्वी दोन ते तीन दिवसात चीनने गलवान खोऱ्यात मोठ्या मशीनरी आणल्या होत्या. त्याद्वारे जमीन सपाट करणे, रस्ता रुंदीकरण करणे आणि नदी प्रवाहावर तात्पुरता पुल बनवण्याचे काम चीनने येथे केल्याचे सॅटेलाईट फोटोंनुसार स्पष्ट होत आहे.   

तसेच भारतीय हद्दीत चीनने तंबू आणि निगराणी पोष्ट उभारले होते. त्यामुळे चीनने पूर्वनियोजित कट रचून भारतीय सैन्यांवर हल्ला केला. भारत आणि चीनमध्ये एलएसीवर गोळीबार किंवा स्फोटके न वापरण्याचा करार झाला असल्याने चिनी सैन्याने लोखंडी रॉड, काटेरी तारा गुंडाललेल्या दंडुक्याने भारतीय सैन्यावर हल्ला केला. यात भारताचे 20 जवान शहीद झाले. तर 70 जवान जखमी झाले आहेत. 

Related Stories

धक्कादायक ! केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोरोनाबाधित

Patil_p

ट्विटर इंडियाच्या ‘एमडी’ विरोधात दुसरा एफआयआर

Patil_p

भारत-इस्रायल संरक्षण सहकार्य वाढविणार

Amit Kulkarni

मान्सूनने देश व्यापला

datta jadhav

न्यूझीलंड संघाचा पाक दौरा डिसेंबरमध्ये

Patil_p

अयोध्येतील मास्टरप्लानचा पंतप्रधानांनी घेतला आढावा

Amit Kulkarni