Tarun Bharat

सॅमसंग भारतात करणार इंजिनियर्सची नियुक्ती

देशात 1,000 हून अधिक पदे भरणार

नवी दिल्ली  

  जगभरात दिग्गज इलेक्ट्रॉनिक्स ब्रँड अशी सॅमसंगची ओळख आहे. आता सॅमसंगकडून भारतातील आरऍण्डडी विभागासाठी 1,000 इंजिनियर्सची नियुक्ती करण्याची योजना आखली जात आहे. सॅमसंगकडून दिल्ली आणि बेंगळूर येथे उमेदवारांची केंद्रांमध्ये भरती होणार आहे. नव्या इंजिनियर्सना 2023 मध्ये कंपनीत सहभागी करुन घेतले जाणार आहे. तसेच आर्टिफिशल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, डीप लर्निंग, इमेज प्रोसेसिंग, आयओटी, कनेक्टिव्हिटी, क्लाउड, बिग डाटा, बिजनेस इंटेलिजन्स, प्रेडिक्टिव ऍनालिसिस, कम्युनिकेशन नेटवर्क्स, सिस्टम ऑन अ चिप या विभागात काम करण्याची संधी मिळणार आहे. स्टोरेज सोल्यूशन्ससाठीही काम करण्यासाठी कंपनी संधी उपलब्ध करणार आहे.

अत्याधुनिक तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रीत

नावीन्यपूर्ण आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करून, सॅमसंगच्या संशोधन आणि विकास केंद्रांनी सर्वोच्च अभियांत्रिकी संस्थांमधून उदयोन्मुख उमेदवारांना नियुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, जे नवकल्पना आणतील व यावरच अधिक सखोलपणे कार्य करतील. तंत्रज्ञान, उत्पादने आणि डिझाइन यामध्ये भारत-केंद्रित नवकल्पनांचाही समावेश आहे. ज्यामुळे लोकांचे जीवन सुधारेल, असेही सॅमसंग इंडियाचे मनुष्य बळ विकास विभागाचे प्रमुख समीर वाधवन यांनी सांगितले आहे.

Related Stories

उत्तर पश्चिम रेल्वेचा विक्रम

Amit Kulkarni

टाटाचा 3 राज्यांमध्ये सेमिकंडक्टरचा प्रकल्प

Patil_p

नेक्साअंतर्गत 14 लाख वाहनांची यशस्वी विक्री

Patil_p

आवास योजनेसाठी गोदरेजकडून जमीन खरेदी

Patil_p

दुसऱया दिवशाही सेन्सेक्स 225 अंकांनी तेजीत

Patil_p

‘नॉमिनी’

Omkar B