Tarun Bharat

सॅमसंग व्हिएतनामधील व्यवसाय भारतात आणणार

आगामी 5 वर्षात नवी योजना आखणार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दक्षिण कोरियाची स्मार्टफोन निर्मिती कंपनी सॅमसंग आता लवकरच आपले उत्पादनांचे प्रकल्प व्हिएतनाममधून भारतात आणणार असल्याचे समजते. यासंदर्भात कंपनीने तयारी सुरु केली आहे. सॅमसंग देशातील तीन लाख कोटीपेक्षा जादा उत्पादनांची निर्मिती करणार आहे, असे समजते.

सॅमसंग आगामी 5 वर्षात देशात 3.7 लाख कोटी रुपयांच्या फोन्सच्या उत्पादनांच्या निर्मितीची योजना बनवत आहे. यामध्ये आयफोन निर्मिती करणारी कंपनी ऍपलकडून अगोदरपासूनच गुंतवणूक करण्याची आखणी केली जात आहे. यासोबत अन्य काही कंपन्या देशात येण्याची योजना तयार करत असल्याची माहिती आहे.

सरकारच्या पीएलआय योजनेअंतर्गत सदर योजना करण्यात येणार असल्याची माहिती आहे. यामध्ये सॅमसंगने इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाच्या वरि÷ अधिकाऱयांसोबत आपल्या योजनेवर चर्चा पूर्ण झाल्याचे म्हटले आहे. प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह योजनेअंतर्गत स्मार्टफोन्स भारतात निर्मिती करण्याची पूर्व तयारी करता येणार आहे. यामध्ये सरकारकडून या योजनेची घोषणा एप्रिलमध्ये करण्यात आली आहे.

भारतीय बाजारातील हिस्सेदारी

सॅमसंग कंपनीची भारतीय मोबाईल फोन बाजारात जवळपास 24 टक्के हिस्सेदारी आहे. सॅमसंगचा एक प्रकल्प हा उत्तर प्रदेशातील नोएडा येथे आहे आणि कंपनीचे जगातील सर्वात मोठे उत्पादन युनिट असल्याचेही स्पष्ट केले आहे.

Related Stories

एप्रिल-सप्टेंबरमध्ये डीमॅट खात्यांमध्ये दुप्पट वाढ

Omkar B

कर्मचाऱयांच्या लसीकरणासाठी कंपन्यांचा आशादायी पुढाकार

Patil_p

भारती दूरसंचार 3.33 टक्के सिंगटेलची हिस्सेदारी करणार खरेदी

Amit Kulkarni

बँकांमधील घोटाळय़ात दुप्पटीने वाढ

Patil_p

पेटीएमचा समभाग 36 टक्के वाढला

Amit Kulkarni

अनाथांची पेन्शन!

Patil_p
error: Content is protected !!