Tarun Bharat

सॅलिव्हा, टेम्परिंग टाळण्यासाठी वजनी चेंडू वापरा

Advertisements

माजी फिरकी गोलंदाज शेन वॉर्नची सूचना

मेलबर्न / वृत्तसंस्था

सॅलिव्हा लावणे व कुरतडण्याशिवाय चेंडू स्विंग व्हावा, यासाठी वजनी चेंडू वापरावेत, अशी सूचना माजी फिरकी गोलंदाज शेन वॉर्नने केली. चेंडू वजनी, जड असेल तर त्याला आणखी लकाकी आणण्याची गरज भासणार नाही आणि तो सहजपणे स्विंग होऊ शकेल, असे वॉर्नचे मत आहे.

चेंडू एका बाजूने वजनी असल्यास जलद गोलंदाज अगदी पाटा खेळपट्टय़ांवर देखील स्विंग करु शकतील आणि यामुळे चेंडू कुरतडण्याचे प्रकार कायमचे बंद होतील, असे वॉर्न म्हणतो. चेंडूला लकाकी यावी, यासाठी सॅलिव्हा लावले जाते किंवा अन्यही प्रकार केले जातात. भविष्यात ते धोकादायक ठरु नयेत, यासाठी यावर पर्याय काय, यावर खल सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर शेन वॉर्नने हा पर्याय सूचवला आहे.

चेंडू न कुरतडता, सॅलिव्हा न लावता स्विंग होत असेल तर खेळाडूंना गैरप्रकार अंमलात आणण्याची गरजच उरणार नाही. बॉटल टॉप्स, सँडपेपर किंवा आणखी काहीही गरजेचे ठरणार नाही आणि अशा परिस्थितीत फलंदाज व गोलंदाज यांच्यात निकोप स्पर्धा, चुरस रंगू शकेल. मागील अनेक वर्षांपासून बॅटमध्ये अनेक बदल झाले आहेत. पण, चेंडूच्या वाटय़ाला हा सन्मान आलेला नाही, याचाही विचार करता येईल, असे वॉर्न म्हणतो.

दरम्यान, चेंडू कुरतडणे, सॅलिव्हा लावणे, यावर मार्ग काढण्यासाठी ऑस्ट्रेलियन उद्योगसंस्था कुकाबुराने वॅक्स अप्लिकेटरची निर्मिती सुरु केली असून ती एका महिन्यात उपलब्ध होईल, असे संकेत आहेत.

Related Stories

किंग्स इलेव्हन पंजाबचा 2021 मधील गेमप्लॅन

Patil_p

चीनमधील सहा फुटबॉलपटूंवर बंदी

Patil_p

विराटच निर्विवाद कर्णधार, मी त्याचा उपनेता!

Patil_p

भारतीय रोईंग संघ ऑलिम्पिकसाठी पात्र

Patil_p

ऑस्ट्रेलिया दौऱयात 5 कसोटी होणे अशक्य

Patil_p

ट्रेंट ब्रिज कसोटीत इंग्लंडचा रोमांचक विजय

Patil_p
error: Content is protected !!