Tarun Bharat

सेंट झेवियर्स, सेंट मेरीज, सेंट पॉल्स, एमव्ही हेरवाडकर उपांत्य फेरीत

रेव्ह. फादर एडी आंतर शालेय फुटबॉल स्पर्धा

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव

सेंटपॉल्स स्कूल आयोजित 54 वी रेव्ह. फादर एडी स्मृती चषक आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी हेरवाडकरने गोमटेशचा, सेंट पॉल्सने सर्वोदय खानापूरचा, सेंट झेवियरने एमव्हीएमचा तर सेंट मेरीजने कनक मेमोरियल संघाचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला.

सेंट पॉल्स हॉस्टेल मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात हेरवाडकर संघाने गोमटेश संघाचा 3-1 असा पराभव केला. पहिल्याच मिनिटाला हेरवाडकरच्या वादीराज ओटगावीच्या पासवर आदित्य भोसलेने पहिला गोल केला. 13 व्या मिनिटाला गोमटेशच्या परमानंद कामतने गोल करून 1-1 अशी बरोबरी करीत सामन्यात रंगत निर्माण केली. 29 व्या मिनिटाला हेरवाडकरच्या वरदच्या पासवर आदित्य भोसलेने दुसरा गोल करून 2-0 ची आघाडी मिळवून दिली. दुसऱया सत्रात खेळ संपण्यास एक मिनिट बाकी असताना आदित्य भोसलेच्या पासवर वरद पावसकरने तिसरा गोल करून 3-1 ची आघाडी मिळवून दिली.

दुसऱया सामन्यात सेंट पॉल्सने सर्वोदय खानापूर संघाचा अटीतटीच्या लढतीत 1-0 अशी मात दिली. पहिल्या सत्रात दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आल्याने गोलफलक कोराच राहिला. दुसऱया सत्रात 47 व्या मिनिटाला नावीनच्या पासवर अवीने गोल करून 1-0 ची आघाडी सेंटपॉलला मिळवून दिली. त्यानंतर सर्वोदयने दोन गोल करण्याच्या नामी संधी दवडल्याने त्यांना पराभवास सामोरे जावे लागले.

तिसऱया सामन्यात सेंट झेवीयर्स संघाने एमव्हीएम संघाचा 4-1 असा पराभव केला. पाचक्या मिनिटाला स्पर्श देसाईच्या पासवर आयान किल्लेदारने पहिला गोल केला. तेराव्या मिनिटाला एमव्हीएमच्या सुजल मोतेकरने 1-1 अशी बरोबरी केली. 23 व्या मिनिटाला अयान किल्लेदारच्या पासवर स्पर्श देसाईने दुसरा गोल करून 2-1 अशी आघाडी पहिल्या सत्रात मिळवून दिली.

दुसऱया सत्रात 39 व्या मिनिटाला रेहान किल्लेदारच्या पासवर अयान किल्लेदारने तिसरा गोल केला. 46 व्या मिनिटाला स्पर्श देसाईच्या पासवर रिहान किल्लेदारने चौथा गोल करून 4-1 अशी आघाडी मिळवून दिली.

चौथ्या सामन्यात सेंट मेरी संघाने कनक मेमोरियल संघाचा 4-0 असा पराभव केला. 16 व्या मिनिटाला यश जाधवच्या पासवर आदित्य चव्हाणने पहिला गोल केला. तिसाऱया मिनिटाला आदित्य चव्हाणच्या पासवर कैलास भाटीने दुसरा गोल करून 2-0 ची आघाडी मिळवून दिली. दुसऱया सत्रात 34 व 46 व्या मिनीटाला यश जाधवने बचाव फळीला चकवत सलग दोन गोल करून 4-0 ची आघाडी मिळवून दिली.

शनिवारी उपांत्य फेरीचे सामने 1) सेंट झेवियर्स वि. सेंट मेरीज, सकाळी 9  वा. 2) सेंट पॉल्स वि. हेरवाडकर यांच्यात सकाळी 10 वा.

Related Stories

पावसाची दडी, बळीराजाचे डोळे आकाशाकडे

Patil_p

निट्टूर ग्राम पंचायतीचे पीडीओ, क्लार्क एसीबीच्या जाळय़ात

Omkar B

तात्पुरत्या भाजीमार्केटमध्ये दलदल

Amit Kulkarni

इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिलच्या विद्यार्थी युनिटचे जीआयटीमध्ये उद्घाटन

Patil_p

हिंदू पंचांगानुसार उद्यापासून नववर्षारंभ

Amit Kulkarni

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी घेतले यल्लमा देवीचे दर्शन

mithun mane
error: Content is protected !!