Tarun Bharat

सेक्स सीडी प्रकरण : माझ्याकडे धक्कादायक पुरावे आहेत : रमेश जारकिहोळी

बेंगळूर/प्रतिनिधी

सेक्स सीडी प्रकरणात अडचणीत सापडलेले आमदार आणि भाजपचे माजी मंत्री रमेश जारकिहोळी यांनी धक्का दायक वक्तव्य केलं आहे. गुरूवारी भाजप नेते रमेश जारकिहोळी यांनी असा दावा केला आहे की, ज्या सेक्स स्कँडलमध्ये ते अडचणीत सापडले आहेत, त्यांच्या मागे कोण आहे हे दाखवण्यासाठी ‘धक्कादायक’ पुरावे आपल्याकडे आहेत, असे म्हणाले.

“माझ्याजवळ याप्रकरणी माझ्या खिशात पुरावा आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल. रमेश यांनी पत्रकारांना सांगितले की, जेव्हा मला वाटेल तेव्हा मी सर्वांसमोर आणणार आहे. रमेश यांनी हा पुरावा त्या ‘महान नेत्या’ विरोधात आहे ज्याने या घोटाळ्याविषयी आरोप केले आहेत. परंतु मी त्या ‘महान नेत्याचे’ नाव जाहीर करणार नाही.

दरम्यान माजी मंत्र्यांनी आपल्या आई-वडिलांचे संरक्षण मिळवण्यासाठी लैंगिक शोषणाचा आरोप करणार्‍या अज्ञात महिलेचा दुसरा व्हिडिओ नाकारला आहे.

रमेश म्हणाले, “कृपया यात गुंतलेल्या व्यक्ती आणि कटाचा विचार करा. “प्रथम, तिचा व्हिडिओ मी १३ मार्च रोजी तक्रार दाखल केल्याच्या अर्ध्या तासाने समोर आला. आता, ती म्हणते की तिचा व्हिडिओ १२ मार्चलाच पाठविला गेला होता. यामागील राजकारण आहे, असे ते म्हणाले. तसेच मी आणखी दहा सीडी सामोरे जाण्यास तयार आहे, असेही जारकिहोळी म्हणाले.

रमेश यांच्या म्हणण्यानुसार या महिलेवर दबाव होता. “तसेच, नियोजन बघा … त्यावेळी (तिचा) आवाज काय होता आणि आता काय आहे?” या ‘षडयंत्रात’ सामील असलेल्यांना तुरूंगात टाकले जात नाही तोपर्यंत आपण गप्प बसणार नाही, असे रमेश यांनी यावेळी सांगितले.

Related Stories

कर्नाटक: ग्रामपंचायतींना ‘या’ कामासाठी मिळणार ५० हजार रुपये

Archana Banage

राज्यात दूध खरेदी दरात वाढ करा!

Amit Kulkarni

एसएसएलसी परीक्षा: नवीन मार्गदर्शक तत्वे जारी

Archana Banage

निजद आमदारांचे धरणे

Amit Kulkarni

…तर तिसरी लाट थोपविणे अशक्य

Amit Kulkarni

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कारला ट्रकची धडक,तीन ठार

Kalyani Amanagi
error: Content is protected !!