Tarun Bharat

सेना ‘विराट’, धावा मात्र फक्त ७८!

Advertisements

भारताच्या फलंदाजी लाईनअपचे अक्षरशः ‘आयाराम गयाराम’, अँडरसन-ओव्हर्टनचे प्रत्येकी 3 बळी, यष्टीरक्षक जोस बटलरचे 5 झेल

लीड्स / वृत्तसंस्था

जेम्स अँडरसन (6 धावात 3 बळी), ऑलि रॉबिन्सन (2-16), सॅम करण (2-27) व क्रेग ओव्हर्टन (3-14) यांच्या तेजतर्रार गोलंदाजीसमोर भारताचा पहिला डाव अवघ्या 78 धावांमध्येच खुर्दा झाला आणि इंग्लिश भूमीत संघाची तिसरी निचांकी धावसंख्या नोंदवली गेली.

नाणेफेक जिंकल्यानंतर विराटने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, पहिल्या काही मिनिटातच हा निर्णय भारतावरच बुमरँग झाल्याचे स्पष्टपणे दिसून आले. अँडरसन व ओव्हर्टन यांनी प्रत्येकी 3 तर ऑलि रॉबिन्सन, सॅम करण यांनी प्रत्येकी 2 बळी घेत भारतीय फलंदाजांच्या मर्यादा प्रकर्षाने चव्हाटय़ावर आणल्या.

भारताची उपाहारापर्यंत 4 बाद 56 अशी दाणादाण उडाली, त्याचवेळी खळबळ माजली होती. पण, खरा पिक्चर तर जणू तेथूनच सुरु झाला. कारण, पुढील 22 धावातच उर्वरित 6 फलंदाज गारद झाले आणि भारताचा 40.4 षटकात सर्वबाद 78 धावांवर खुर्दा झाला.

अनुभवी जेम्स अँडरसनने आपली गोलंदाजीच अधिक बोलेल, याची उत्तम तजवीज करत केएल राहुल, चेतश्वर पुजारा व कर्णधार विराट कोहली यांचे पहिल्या सत्रात बळी घेत इंग्लिश संघाला अगदी स्वप्नवत सुरुवात करुन दिली. ऑलि रॉबिन्सननेही अजिंक्य रहाणेला 18 धावांवर बाद केले आणि 4 बाद 56 या धावसंख्येवर उपाहाराचा खेळ थांबवला गेला. रोहित यावेळी 15 धावांवर खेळत होता.

अर्थात, उपाहारानंतरही परिस्थितीत फारसा बदल झालाच नाही आणि भारतीय फलंदाजांचे ‘आयाराम-गयाराम’ सुरुच राहिले. चार फलंदाज तर 67 या धावसंख्येवरच बाद झाले. रिषभ पंत उसळत्या चेंडूवर आक्रमक फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला तर 105 चेंडूत 19 धावांची रोहितची खेळी पुन्हा एकदा उसळत्या चेंडूवरच संपुष्टात आणली गेली. आघाडीवीर स्वस्तात गारद झाल्यानंतर मधल्या फळीने तोच कित्ता गिरवला आणि तळाच्या फलंदाजांनी तर त्यापेक्षाही आणखी घाई केली. यामुळे, भारताचा डाव 40.4 षटकातच गुंडाळला गेला.

धावफलक

भारत पहिला डाव ः रोहित शर्मा झे. रॉबिन्सन, गो. ओव्हर्टन 19 (105 चेंडूत 1 चौकार), केएल राहुल झे. बटलर, गो. अँडरसन 0 (4 चेंडू), चेतेश्वर पुजारा झे. बटलर, गो. अँडरसन 1 (9 चेंडू), विराट कोहली झे. बटलर, गो. अँडरसन 7 (17 चेंडूत 1 चौकार), अजिंक्य रहाणे झे. बटलर, गो. रॉबिन्सन 18 (54 चेंडूत 3 चौकार), रिषभ पंत झे. बटलर, गो. रॉबिन्सन 2 (9 चेंडू), रविंद्र जडेजा पायचीत गो. करण 4 (29 चेंडू), मोहम्मद शमी झे. बर्न्स, गो. ओव्हर्टन 0 (1 चेंडू), इशांत शर्मा नाबाद 8 (10 चेंडूत 1 चौकार), जसप्रित बुमराह पायचीत गो. करण 0 (1 चेंडू), मोहम्मद सिराज झे. रुट, गो. ओव्हर्टन 3 (10 चेंडू). अवांतर 16. (लेग बाईज-11, नोबॉल-5) एकूण 40.4 षटकात सर्वबाद 78.

गडी बाद होण्याचा क्रम

1-1 (केएल राहुल, 0.5), 2-4 (पुजारा, 4.1), 3-21 (विराट, 10.5), 4-56 (रहाणे, 25.5), 5-58 (रिषभ, 29.1), 6-67 (रोहित, 36.4), 7-67 (शमी, 36.5), 8-67 (रविंद्र जडेजा, 37.2), 9-67 (बुमराह, 37.3), 10-78 (सिराज, 40.4)

गोलंदाजी

जेम्स अँडरसन 8-5-6-3, ओलि रॉबिन्सन 10-3-16-2, सॅम करण 10-2-27-2, मोईन अली 2-0-4-0, क्रेग ओव्हर्टन 10.4-5-14-3.

इंग्लंड पहिला डाव ः (चहापानापर्यंत) रोरी बर्न्स खेळत आहे 3 (19 चेंडू), हसीब हमीद खेळत आहे 15 (25 चेंडूत 2 चौकार). अवांतर 3 (नोबॉल-2, वाईड-1). एकूण 7 षटकात बिनबाद 21.

गोलंदाजी

इशांत शर्मा 3-0-14-0, जसप्रित बुमराह 3-1-7-0, मोहम्मद शमी 1-1-0-0

अवघ्या 6 चेंडूत 4 फलंदाज बाद आणि भारत 5 बाद 67 वरुन 9 बाद 67!रिषभपंत 5 व्यागडय़ाच्यारुपानेबादझाला,त्यावेळीभारताची 5 बाद 58 अशीदैनाउडाली.त्यानंतरकशीबशी 5 बाद 67 पर्यंतमजलमारलीअसतानारोहितशर्मा(19),मोहम्मदशमी(0),रविंद्रजडेजा(4),जसप्रितबुमराह(0)हे 4 फलंदाजअवघ्या 6 चेंडूतचबादझालेआणिपाहतापाहतासंघाचाडाव 5 बाद 67 वरुन 9 बाद 67 असागडगडला.सिराजशेवटच्यागडय़ाच्यारुपानेबादझाला,त्यापूर्वीशेवटचीजोडीयात 11 धावांचीभरघालूशकली

Related Stories

न्यूझीलंड विश्व कसोटी स्पर्धेच्या अंतिम फेरीत

Patil_p

भारत-न्यूझीलंड आज दुसरा सामना

Patil_p

बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धा एका दिवसाने लांबणीवर

Patil_p

मुंबई इंडियन्स पंजाबविरुद्ध आज खाते उघडणार?

Patil_p

राष्ट्रीय हॉकी स्पर्धेच्या रचनेत बदल होणार

Patil_p

अल्टिमेट खो-खो स्पर्धा आजपासून

Patil_p
error: Content is protected !!