Tarun Bharat

सेनेच्या आंदोलनाला साताऱयात पोलिसांचा ब्रेक

प्रतिनिधी/ सातारा

भाजपाचे आशिष शेलार यांनी सेनेबाबत केलेल्या वक्तव्याचे पडसाद सातारा जिह्यातही उमटले. सातारा जिह्यात वाई येथील शिवसैनिकांनी प्रतिकात्मक फोटोस चप्पलाने मारुन निषेध नोंदवला. तर साताऱयातल्या आंदोलनकर्त्यांचे आंदोलनाला पोलिसांनी ब्रेक लावला.अन् पोलिसांना माहिती पडताच शिवसैनिकांनी  तयार केलेला पुतळा बाहेर काढाल तर गुन्हे दाखल करु असा दम पोलिसांनी भरताच केवळ शिवसैनिकांनी निषेध नोंदवला.

शिवसैनिक पोवई नाका येथे आंदोलन करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली अन् पोलीस शिवसेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी जमण्यापूर्वी पोहचले. पोलिसांनी त्यांना आंदोलन करण्यापासून रोखले. प्रतिकात्मक पुतळाही ताब्यात घेतला. यावेळी बोलताना उपजिल्हा प्रमुख सचिन मोहिते म्हणाले, मुख्यमंत्री उध्दव साहेबांचा अत्यंत चांगल्या पद्धतीने कारभार चाललेला असताना आशिष शेलार सारखे नेते बेताल वक्तव्य करत आहेत. यामुळे सातारा शिवसेनेच्यावतीने निषेध करण्यात येत आहे. या आंदोलनात तालुका प्रमुख आतिष ननावरे, तालुका प्रमुख सातारा अनिल गुजर, शहर प्रमुख बाळासाहेब शिंदे, निमिश शहा, शिवाजी   सावंत,  नंदू केसरकर,  तानाजी चव्हाण, निलेश मोरे, सयाजी शिंदे, सागर रायते नितीन लकेरी, गणेश कांबळे, मोहित शहा यांच्यासह कार्यकर्ते होते. तर वाई आणि महाबळेश्वर येथेही आंदोलन झाले.

 

 

Related Stories

विद्यानगरला ऑनलाईन परीक्षेसाठी विद्यार्थांचा गोंधळ

Patil_p

सिनेमागृहे, नाटय़गृहे प्रेक्षकांसाठी खुली होणार

Patil_p

ग्वाल्हेर-बँगलोर आशियाई महामार्गावर भीषण अपघात

Archana Banage

येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष

Patil_p

मास असोसिएशनकडून कैलास स्मशानभूमीस दोन अग्निकुंड भेट

Patil_p

सातारा शहराचा चक्का जाम

Archana Banage