Tarun Bharat

सेन्सेक्सचा नवा उच्चांक

नवी दिल्ली/प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांपासून मुंबई शेअर बाजारामध्ये तेजी पाहायला मिळत आहे. गेल्या महिन्याभरात शेअर बाजाराने रोज नवनवे उच्चांक गाठले आहेत. गेल्या महिन्यात सेन्सेक्सने (Sensex) ६० हजारांचा टप्पा गाठला होता. आज पुन्हा मुंबई शेअर बाजार (share market opening trade) उघडताच सेन्सेक्सनं थेट ६१ हजारांच्या वर विक्रमी झेप घेतली. त्यामुळे खरेदी-विक्रीमध्ये मोठ्या हालचाली दिसून आल्या. दरम्यान, भांडवली बाजाराची सुरुवात सेन्सेक्सने ३०७ अंकांची उडी घेतली, सध्या सेन्सेक्स ६१,०४४.१५ वर आहे, तर निफ्टी (Nifty) १८,२६१.१५ वर आहे.

भारतीय भांडवली बाजाराची सुरुवात ही मजबुतीसोबत झाली. सेन्सेक्सने नवा इतिहास नोंदवला आहे. सेन्सेक्स प्रथमच ६१ हजारांवर वर खुला झाला. यामध्ये इन्फोसिस, टेक महिंद्रा, आयटीसी, एल अँड टी, एनटीपीसी, टाटा स्टील, मारुति सुझुकी, एचसीएल टेक, अल्ट्राटेक सिमेंट, आरआयएल या कंपन्यांच्या शेअर्सचा भाव चांगलाच वधारल्याचं दिसून आलं. मात्र, पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, एम अँड एम, हाउसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन अर्थात एचटीएफसी, भारती एअरटेल आणि इंडसइंड बँक या कंपन्यांना शेअर्स वर ठेवण्यासाठी आज बराच काथ्याकूट करावा लागला.

Related Stories

नादुरूस्त रस्त्याने घेतले पाच जणांचे बळी

Archana Banage

मंत्र्याचे बेताल वक्तव्य : वृध्द दगावले तरी चालेल; मुलांना मिळाली पाहिजे होती लस

Tousif Mujawar

बाधितांच्या महाविस्फोटाने धडकी

Patil_p

बिहार : लग्नानंतर दोन दिवसातच वराचा मृत्य; लग्नातील 95 पाहुणे कोरोना पॉझिटिव्ह

Tousif Mujawar

राजस्थानच्या बाडमेर येथे सरावादरम्यान MIG-21 फाइटर जेट कोसळले

Archana Banage

फळांच्या राज्याची अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर एपीएमसीमध्ये 50 हजार पेट्यांची आवक

Archana Banage
error: Content is protected !!