Tarun Bharat

सेन्सेक्समध्ये पुन्हा 1,040 अंकांची उसळी

आयटी, बँक आणि आर्थिक समभागांचा लिलाव : निफ्टीही तेजीत

वृत्तसंस्था/ मुंबई

भारतीय भांडवली बाजारात चालू आठवडय़ातील दुसऱया सत्रात मंगळवारी घसरणीचे वातावरण राहिले होते, परंतु दुसऱया दिवशी बुधवारी मात्र पुन्हा तेजीची नोंद करत बाजाराने उच्चांकी टप्पा प्राप्त केल्याचे दिसून आले. यामध्ये सेन्सेक्सने तब्बल 1,000 अंकांची उसळी घेतली होती. दुसऱया बाजूला रशिया आणि युक्रेन यांच्यातील सुरु असलेल्या चर्चेचा बाजारात सकारात्मक परिणाम राहिल्याचे दिसून आले.

दिग्गज क्षेत्रांपैकी आयटी, बँक आणि आर्थिक कंपन्यांच्या समभागात लिलावची स्थिती राहिल्याचा लाभ बुधवारी भारतीय बाजाराला मोठय़ा प्रमाणात झाला. जागतिक पातळीवरील मजबूत स्थितीमुळे भारतीय बाजारात उत्साहाचे वातावरण राहिले. सेन्सेक्स दिवसअखेर 1,039.80 अंकांनी वधारुन 56,816.65 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा 312.35 अंकांनी वधारुन निर्देशांक 16,975.35 वर बंद झाला आहे.

दिग्गज कंपन्यांमध्ये बुधवारी अल्ट्राटेक सिमेंटचे समभाग सर्वाधिक पाच टक्क्यांनी तेजीत राहिले असून अन्य कंपन्यांमध्ये ऍक्सिस बँक, इंडसइंड बँक, एचडीएफसी, बजाज फिनसर्व्ह, इन्फोसिस आणि बजाज फायनान्स यांचे समभाग तेजीसह बंद झाले. दुसरीकडे सन फार्मा व पॉवरग्रिड कॉर्प नुकसानीसोबत बंद झाले.

अन्य घडामोडी

जागतिक पातळीवरील आशियातील अन्य बाजारात जपानचा निक्की, दक्षिण कोरियाचा कोस्पी, हाँगकाँगचा हँगसेंग आणि चीनचा शांघाय कम्पोझिट हे लाभासह बंद झालेत. युरोपमधील प्रमुख बाजारात दुपारपर्यंत तेजीचा कल होता. दुसरी महत्वाची घटना म्हणजे मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या रशिया युक्रेन यांच्या युद्धजन्य परिस्थतीवर दोन्ही देशांमध्ये सामंजस्यासाठी चर्चा सुरु आहे. याचाही प्रभाव भारतासह अन्य शेअर बाजारांवर राहिला आहे.

Related Stories

दोन कंपन्यांचा दबदबा योग्य नाही – ट्राय

Patil_p

भारताकडून व्यापार सुलभतेसाठी प्रयत्न

Patil_p

इंडिया पेन्ट्सच्या आयपीओला सेबीची मंजुरी

Patil_p

भारतामध्ये मेटाचे उत्पन्न 16 टक्क्यांनी वधारले

Patil_p

डीएचएफएलला 97 कोटीचा नफा

Patil_p

साडेचार कोटी लोकांनी आवडत्या हॉटेलात केले जेवण

Amit Kulkarni