Tarun Bharat

सेन्सेक्स निर्देशांक 209 अंकांनी तेजीसह बंद

Advertisements

सलगची घसरण थांबली : जागतिक बाजारात सकारात्मकता

वृत्तसंस्था /मुंबई

भारतीय भांडवली बाजारात चालू आठवडय़ातील सलग तीन सत्रांमध्ये घसरणीचा कल राहिला होता. परंतु चौथ्या दिवशी गुरुवारी मात्र या घसरणीच्या प्रवासाला विराम मिळाल्याचे दिसून आले आहे. सेन्सेक्स 209 अंकांनी मजबूतीसोबत बंद झाला आहे.

दिवसभरात स्थानिक घडामोडींसोबत जागतिक पातळीवर सकारात्मक वातावरण राहिले असून यामुळे टाटा स्टील, भारतीय स्टेट बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांच्या समभागात तेजी राहिल्याचे दिसून आले.

दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स 209.36 अंकांनी वधारुन निर्देशांक 52,653.07 वर बंद झाला असून 0.40 टक्क्यांची तेजी राहिली आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 69.05 अंकांसोबत 0.44 टक्क्यांच्या मजबूतीने निर्देशांक 15,778.45 वर बंद झाल्याचे पहावयास मिळाले आहे.

प्रमुख कंपन्यांच्या मदतीने टाटा स्टीलचे समभाग सर्वाधिक म्हणजे 7 टक्क्यांनी तेजीत राहिले असून यासह बजाज फिनसर्व्ह, स्टेट बँक, एचसीएल टेक, सन फार्मा, बजाज फायनान्स आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागांनी चांगली तेजी प्राप्त केलेली दिसली. दुसऱया बाजूला मारुती सुझुकी, पॉवरग्रिड कॉर्प, बजाज ऑटो आणि आयटीसीसह अन्य कंपन्यांचे समभाग घसरणीत राहिले आहेत.

भांडवली बाजारात सकारात्मक स्थिती प्राप्त होण्यास जागतिक पातळीवरील स्थिती आणि धातूसह आयटी क्षेत्रातील समभागांच्या लिलावामुळे भारतीय बाजाराला बळकटी मिळाली आहे. प्रमुख समभागांमध्ये व्यवहार पूर्ण करण्यासाठी लिलावासोबत तेजीची मदत मिळाली, यामध्ये वाहन, दैनंदिन वापरातील साहित्याचा वापर करणाऱया कंपन्या आणि औषध कंपन्यांच्या समभागात नरमाईचा कल राहिला होता. याचा प्रभाव बाजारात राहिल्याचे दिसले.

जागतिक पातळीवरील बाजारात शांघाय, हाँगकाँग, टोकीओ आणि सिओल हे तेजीत राहिले असून युरोपातील प्रमुख बाजारातील वातावरण सकारात्मक स्थितीत राहिल्याचे पहावयास मिळाले आहे.

समभाग वधारलेल्या कंपन्या

 • टाटा स्टील…. 1459
 • बजाज फिनसर्व्ह 14590
 • स्टेट बँक………. 441
 • एचसीएल टेक 1007
 • सन फार्मा……. 703
 • बजाज फायनान्स 6394
 • रिलायन्स इंडस्ट्रीज 2055
 • टायटन……… 1735
 • टेक महिंद्रा…. 1127
 • इन्फोसिस….. 1616
 • महिंद्रा ऍण्ड महिंद्रा 732
 • अल्ट्राटेक सिमेंट 7675
 • आयसीआयसीआय 687
 • लार्सन ऍण्ड टुब्रो 1595
 • हिंडाल्को……… 458
 • वेदान्ता……….. 288
 • कॅनरा बँक……. 149
 • अशोक लेलँड…. 125
 • ज्युबिलंट फूड. 3722
 • ग्लेनमार्क……… 594
 • कमिन्स……….. 844

समभाग घसरलेल्या कंपन्या

 • मारुती सुझुकी 6991
 • पॉवरग्रिड कॉर्प. 167
 • बजाज ऑटो… 3762
 • आयटीसी…….. 206
 • डॉ.रेड्डीज लॅब. 4671
 • हिंदुस्थान युनि 2333
 • ऍक्सिस बँक….. 717
 • कोटक महिंद्रा. 1641
 • एचडीएफसी.. 2413
 • नेस्ले……….. 17914
 • एशियन पेन्ट्स 2997
 • भारती एअरटेल 566
 • इंडसइंड बँक…. 991
 • टीसीएस……. 3196
 • एचडीएफसी बँक 1417
 • कोलगेट…….. 1709
 • टोरंटो फार्मा.. 3020
 • ल्यूपिन……… 1085
 • एसीसी……… 2362
 • कोल इंडिया….. 142
 • बंधन बँक        292

Related Stories

विप्रो कंझ्युमर उतरणार पॅकेज फूड व्यवसायात

Patil_p

ऍमेझॉनचा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल 4 ऑक्टोबरपासून

Patil_p

विमानाच्या इंधन दरात पुन्हा वाढ

Patil_p

साखर उत्पादन 61 टक्क्यांनी वाढले

Patil_p

एचडीएफसी बँकेने वाढवले व्याजदर

Patil_p

कोरोना काळात एलआयसीची कमाई तेजीत

Patil_p
error: Content is protected !!