Tarun Bharat

सेन्सेक्स विक्रमासह सलग सहाव्यांदा तेजीत

सेन्सेक्स 70 तर निफ्टी 19 अंकांनी वधारला

वृत्तसंस्था/ मुंबई  

भारतीय भांडवली बाजारातील तेजीचा प्रवास सलग सहाव्या दिवशीही कायम राहिला असून सेन्सेक्सने सप्ताहातील शेवटच्या दिवशी शुक्रवारी नवा विक्रम प्राप्त केल्याची नोंद केली आहे.

दिवसभराच्या कामगिरीनंतर सेन्सेक्सने सरतेशेवटी 70 अंकांनी वधारुन नवा उच्चांक गाठला आहे. यामध्ये इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक, टीसीएस आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग वधारल्याने शेअर बाजाराने मजबूत स्थिती प्राप्त केली आहे.

दिग्गज कंपन्यांच्या बळकटीच्या जोरावर शुक्रवारी दिवसअखेर सेन्सेक्स 70.35 अंकांनी वधारुन निर्देशांक 46,960.69 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 19.85 अंकांच्या मजबूतीसह निर्देशांक 13,760.55 वर स्थिरावला आहे.

प्रमुख कंपन्यांमध्ये इन्फोसिसचे समभाग सर्वाधिक तीन टक्क्यांनी वधारले आहेत. बजाज ऑटो, स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक, एचसीएल टेक, टायटन आणि एशियन पेन्ट्स नफा कमाईत राहिले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये इंडसइंड बँक, ओएनजीसी, एचडीएफसी बँक, मारुती सुझुकी आणि बजाज फिनसर्व्ह यांचे समभाग मात्र घसरणीसह बंद झाले आहेत.

मागील काही दिवसांपासून जागतिक पातळीवरील घडामोडीसह देशातील कोरोनाचा प्रभाव ओसरत आहे. तसेच लसीसंदर्भात येणाऱया सकारात्मक बातम्या आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील बदलत जाणारे राजकीय डावपेच याचा अप्रत्यक्षपणे भारतीय भांडवली बाजारावर सकारात्मक प्रभाव पडत असल्याने सेन्सेक्स -निफ्टी दिवसागणिक नवा उच्चांक प्राप्त करत असल्याचे अभ्यासकांनी स्पष्ट केले आहे.

विदेशी गुंतवणुकीचा प्रभाव

विदेशी गुंतवणुकीचा दररोज नवा प्रवाह प्राप्त होत असल्याने भारतीय शेअर बाजाराला मजबूत स्थिती प्राप्त होत आहे. यात उपलब्ध आकडेवारीनुसार विदेशी पोर्टफोलियो गुंतवणूकदारांनी (एफपीआय) निव्वळ स्वरुपात 2,355.25 कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले आहेत.

Related Stories

एलआयसी हाऊसिंगकडून गृहकर्ज व्याजदरात वाढ

Patil_p

‘केमफॅब’ समभागाचा उत्तम परतावा

Amit Kulkarni

टाटा मोटर्सचा समभाग घसरला

Amit Kulkarni

विशेष रेल्वेतून 16 कोटींची तिकिटविक्री

Patil_p

आतापर्यंत पाच कोटीपेक्षा अधिकचे आयटी रिटर्न सादर

Amit Kulkarni

90 टक्के मार्गांवर मालवाहतूक भाडेवाढ

Patil_p