Tarun Bharat

सेन्सेक्स 627 अंकांनी घसरला

निफ्टी 154.40 अंकांनी प्रभावीत – जागतिक बाजाराचा प्रभाव

वृत्तसंस्था / मुंबई

जागतिक बाजारातील नकारात्मक वातावरणामुळे भारतीय भांडवली बाजार बुधवारी जवळपास 627 अंकांनी कोसळला आहे. मात्र सेक्सेक्समध्ये मजबूत स्थिती प्राप्त करणाऱया कंपन्यांमध्ये एचडीएफसी बँक, एचडीएफसी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि इन्फोसिस यासारख्या कंपन्यांचे समभाग घसरणीसोबत बंद झाले आहेत.

दिवसभरातील कामगिरीनंतर बीएसई सेन्सेक्स 627.43 अंकांनी प्रभावीत होत 1.25 टक्क्यांच्या घसरणीसोबत निर्देशांक 49,509.15 वर बंद झाला. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 154.40 अंकांनी प्रभावीत होत 1.04 टक्क्यांनी घसरुन निर्देशांक 14,690.70 वर बंद झाल्याचे पहावयास मिळाले आहे.

प्रमुख कंपन्यांच्या कामगिरीनंतर बुधवारच्या सत्रात शेअर बाजार एचडीएफसी बँक आणि एचडीएफसीचे समभाग जवळपास 4 टक्क्यांनी घसरले आहेत. यासोबत पॉवरग्रिड कॉर्प, टेक महिंद्रा, आयसीआयसीआय बँक, ओएनजीसी, कोटक बँक, एशियन पेन्ट्स, इन्फोसिस आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभागही प्रभावीत होत बंद झाले आहेत. दुसऱया बाजूला आयटीसी, बजाज फिनसर्व्ह, हिंदुस्थान युनिलिव्हर, भारतीय स्टेट बँक आणि टीसीएसचे समभाग नफा कमाईत राहिले आहेत.

कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रभावाने चिंता वाढत राहिली असून यामुळे लॉकडाऊच्या भीतीमुळे गुंतवणूकदारांमध्ये याचा नकारात्म परिणाम पडत राहिला आहे. यामुळे देशातील शेअर बाजारातील प्रमुख कंपन्यांचे समभाग घसरणीत राहिल्याची नोंद करण्यात आली आहे.

अन्य घडामोडींचा प्रभाव

आर्थिक क्षेत्रातील खासगी बँकांमधील समभागात मोठय़ा प्रमाणात नफा कमाई झाल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे, या व्यतिरिक्त आयटी क्षेत्रातील कंपन्यांचे समभागामुळे विक्रीत दबाव राहिला आहे. गुंतवणूकदार दैनदिन वापरातील साहित्यांची निर्मिती करणाऱया कंपन्या, धातू आणि औषध कंपन्यांचे समभागात सलगची गुंतवणूक राहिली आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर मात्र बुधवारी आशियासह अन्य बाजारात शांघाय, हाँगकाँग, सोल आणि टोकीयो हे शेअर बाजार नुकसानीत राहिले आहेत. भारतीय वेळेनुसार दुपारी युरोपातील प्रमुख बाजारात घसरणीचा कल राहिला आहे. यादरम्यान जागितक तेल मानक ब्रेंट क्रूड 0.58 टक्क्यांच्या घसरणीसोबत 63.80 डॉलर प्रति बॅरेलवर राहिला आहे.

Related Stories

..‘गुगल’मध्ये चालू वर्षात भरती प्रक्रिया संथ?

Amit Kulkarni

ओप्पोने कारखान्यातील काम थांबविले

Patil_p

एस अँड पीने विकास दर घटवला

Amit Kulkarni

इन्फोसिससह अन्य कंपन्यांच्या कामगिरीने तेजी

Patil_p

व्हर्लपूलची एलिकात हिस्सेदारी

Patil_p

चौफेर विक्रीच्या दबावामुळे सेन्सेक्स कोसळला

Amit Kulkarni