Tarun Bharat

सेन्सेक्स 63,000 वर, नव्या विक्रमाची नोंद

सेन्सेक्समध्ये मोठा वधार ः 63 हजारांवर पेहोचला

वृत्तसंस्था/ मुंबई

जागतिक बाजारांमध्ये सकारात्मक स्थिती राहिल्यामुळे आणि विदेशी गुंतवणूकदारांमधील उत्साह कायम राहिल्याने बुधवारच्या सत्रात बीएसई सेन्सेक्सने सलग सातव्या सत्रात विक्रमी टप्पा प्राप्त करत आपल्या नव्या कामगिरीची नोंद केली आहे. दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स प्रथमच नवी 63,000 ची उंची प्राप्त करत बुधवारी बंद झाला आहे.

प्रमुख कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 417.81 अंकांनी म्हणजे 0.67 टक्क्यांच्या मजबूतीसोबत निर्देशांक 63,099.65 वर बंद झाला आहे. यासोबतच नवा उच्चांक प्राप्त करत सेन्सेक्स बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांक निफ्टी 140.30 अंकांनी वधारुन 18,758.35 वर बंद झाल्याचे दिसून आले. यासोबतच काहीकाळ सेन्सेक्स 621.17 अंकांनी मजबूत स्थितीत राहिला होता.

प्रमुख कंपन्यांमध्ये महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, अल्ट्राटेक सिमेंट, पॉवरग्रिड कॉर्प, हिंदुस्थान युनिलिव्हर, भारती एअरटेल, एशियन पेंट्स, टाटा स्टील आणि टायटन यांचे समभाग सर्वाधिक लाभात राहिले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये इंडसइंड बँक, भारतीय स्टेट बँक, एचसीएल टेक आणि आयटीसी यांचे समभाग नुकसानीसह बंद झाले आहेत.

विदेशी गुंतवणुकीचा प्रभाव

विदेशी संस्थांकडून करण्यात आलेल्या गुंतवणुकीमुळे देशातील भांडवली बाजारांचा प्रवास मजबूत राहिल्याचे दिसून आले. दुसरीकडे बाजारांच्या नजरा अमेरिकन फेडरल रिझर्व्हचे प्रमुख जेरोम पावेल यांनी केलेल्या भाष्यावर टिकून राहिल्या होत्या.

आशियातील अन्य बाजारांमध्ये दक्षिण कोरियाचा कॉस्पी, चीनचा शांघाय कम्पोझिट आणि हाँगकाँगचा हँगसेंग हा वाढीसोबत बंद झाला आहे. तर जपानचा निक्की मात्र घसरणीसह बंद झाला आहे. याच दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल 1.83 टक्क्यांनी वधारुन 84.55 डॉलर्स प्रति बॅरेलवर राहिले होते.

Related Stories

बँक ऑफ महाराष्ट्र नफ्यात

Patil_p

बँकिंग क्षेत्राचा चेहरामोहरा बदलणार

Omkar B

झोमॅटोचा नाइलाजास्तव आयपीओ?

Patil_p

जनरल इन्शुरन्सकडून वाहन विम्याचे दावे निकाली

Patil_p

बिरला म्युच्युअल फंड 7 योजनांना रोल ओव्हर करण्याचे संकेत

Patil_p

लॉरस लॅब्सचा वर्षात 500 टक्के परतावा

Patil_p