Tarun Bharat

सेबॅस्टियन व्हेटेलचा फेरारीला लवकरच निरोप

Advertisements

वृत्तसंस्था/ पॅरीस

एफ-वन आंतरराष्ट्रीय मोटार रेसिंग ग्रां प्रि क्षेत्रात आतापर्यंत चारवेळा एफ-वन विश्वविजेतेपद मिळविणारा चालक सेबॅस्टियन व्हेटेल 2020 च्या रेसिंग हंगामाअखेर आपल्या फेरारी संघाचा निरोप घेणार आहे.

जर्मनीच्या 32 वर्षीय व्हेटेलने एफ-वन मोटार रेसिंग क्षेत्रामध्ये आपले वर्चस्व ठेवले आहे. मात्र फेरारी संघाकडून व्हेटेलच्या स्थानी दुसऱया चालकाची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. 2015 साली व्हेटेलने रेडबुल संघाचे प्रतिनिधीत्व केले होते. त्याने आतापर्यंत आपल्या वैयक्तिक मोटार रेसिंग कारकीर्दीत एकूण 53 शर्यती जिंकल्या असून त्यापैकी 14 शर्यती फेरारी संघाचे प्रतिनिधीत्व करताना जिंकल्या आहेत. फेरारी बरोबरचा व्हेटेलचा करार संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. दरम्यान फेरारी संघाने व्हेटेलला केवळ एक वर्षांच्या कालावधीसाठी करारबद्ध करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच त्याच्या वेतनातही कपात होणार होती. त्यामुळे व्हेटेलने फेरारीचा निरोप घेण्याचे ठरविले आहे.

Related Stories

सिग्नेचर स्टाईल… युसेन बोल्ट…अन् आरसीबीला पाठिंबा!

Amit Kulkarni

माँट्रियल टेनिस स्पर्धेत इटलीची जॉर्जी विजेती

Patil_p

ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड टी-20 मालिका रद्द

Patil_p

मारक्विनोस अर्सेनेलमध्ये दाखल

Patil_p

आसामने महाराष्ट्राला 175 धावांवर गुंडाळले

Patil_p

इंग्लंडचा दक्षिण आफ्रिकेवर 41 धावांनी विजय

Amit Kulkarni
error: Content is protected !!