Tarun Bharat

सेरुला भूखंडप्रकरणी तीन आठवडय़ात उत्तर सादर करा

प्रतिनिधी/ पणजी

सेरुला भूखंडप्रकरणी कोमुनिदादने तीन आठवडय़ाच्या आत उत्तर सादर करावे व उत्तर सादर न झाल्यास कोमुनिदादच्या एटर्नीने कोमुनिदादमधील सर्व दस्तावेज घेऊन न्यायालयात प्रत्यक्ष हजर राहावे, असा आदेश गोव्यातील मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.

जेरेमिनो ओलिवेरा डिसोझा यांनी सादर केलेल्या याचिकेवर न्या. एम. एस. सोनक व न्या. श्रीमती. एम. एस. जवळकर या न्यायपीठासमोर सुनावणीस आली तेव्हा परत एकदा न्यायपीठाने जाब विचारला. उत्तर देण्यासाठी यापूर्वी मुदत देऊनही कोमुनिदादने उत्तर सादर केले नाही. आता परत 3 आठवडय़ाची मुदत देण्यात आली आहे.

न्यायालयाला किंमत न देता न्यायालयाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करण्याचा प्रकार होत असल्याने उत्तर का सादर करण्यात आले नाही याची कारणे सादर करण्यात यावीत आणि उत्तर जर समाधानकारक नसेल तर संबंधित अधिकाऱयाला वैयक्तिक दंड दिला जाईल, असे न्यायपीठाने स्पष्ट केले व पुढील सुनावणी दि. 5 जुलै 2021 रोजी ठेवली आहे.

Related Stories

पणजी महापौरपदी रोहित मोन्सेरात

Amit Kulkarni

गोव्यात आगामी सरकार ‘आप’चे

Patil_p

कळंगुटमधील डान्सबार बंदीसाठी अधिवेशनात बिल आणावे

Patil_p

अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी खाणकाम पुन्हा सुरू करणे महत्त्वाचेः पी चिदंबरम

Amit Kulkarni

सामाजिक बांधिलकी जपलेले स्व. डॉ. सतीश फळदेसाई

Amit Kulkarni

लवकरच म्हादई बचाव मेराथॉन

Patil_p