Tarun Bharat

सेरेना उपांत्यपूर्व फेरीत

वृत्तसंस्था/ मेलबर्न

येथे सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅमपूर्व यारा व्हॅली क्लासिक टेनिस स्पर्धेत अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने उपांत्यपूर्व फेरी गाठताना त्स्वेताना पिरोन्कोव्हाचा पराभव केला.

23 ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे मिळवलेल्या सेरेनाने बल्गेरियाच्या पिरोन्कोव्हावर 6-1, 6-4 अशी मात केली. तिने पहिला सेट केवळ 28 मिनिटांत जिंकला. दुसऱया सेटमध्ये मात्र पिरोन्कोव्हाने प्रतिकार करीत तीनदा मॅचपॉईंट्स वाचविले. एका जोरदार परतीच्या फटक्यावर सेरेनाने सेटसह सामनाही संपविला. सेरेनाने 2017 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर तिला एकही ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकता आलेली नाही. अन्य एका सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या ऍश्ले बार्टीने मेरी बुझकोव्हावर 6-0, 4-6, 6-3 अशी मात केली. तिची उपांत्यपूर्व लढत शेल्बी रॉजर्सशी होणार आहे. सोफिया केनिननेही आगेकूच केली असून तिने जेसिका पेगुलाचा 5-7, 7-5, 6-2 असा पराभव केला.

Related Stories

भारताच्या ग्रीको रोमन प्रशिक्षकाची उचलबांगडी

Patil_p

भारत-विंडीज पहिली टी-20 लढत आज

Patil_p

ऑस्ट्रेलियाचा 511 धावांचा डोंगर

Patil_p

राजस्थान, पंजाब, केकेआर संघांचे युएईमध्ये आगमन

Patil_p

सेतू एफसी संघाचा सलग चौथा विजय

Patil_p

ऑलिम्पिक तिकीट मिळवलेला कुस्तीपटू सुमित मलिक डोप टेस्टमध्ये फेल

Archana Banage