Tarun Bharat

सेरेना, पिरोन्कोव्हा चौथ्या फेरीत

Advertisements

स्टिफेन्स, सिलिक पराभूत, थिएम, अझारेन्का विजयी rमेदवेदेव्ह पुढील फेरीत

न्यूयॉर्क :

 अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत सेरेना विल्यम्स, पिरोन्कोव्हा यांनी महिला एकेरीत शेवटच्या सोळांमध्ये स्थान मिळविले. स्टिफेन्स, मारिन सिलिक, खचानोव्ह स्पर्धेबाहेर पडले तर अझारेन्का, केनिन, थिएम, मेदवेदेव्ह यांनी विजय मिळविले.

24 वे ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या प्रयत्नात असणाऱया सेरेनाने आपल्याच देशाच्या स्लोअन स्टिफेन्सचा कडवा प्रतिकार 2-6, 6-2, 6-2 असा संपुष्टात आणत आगेकूच केली. तिची उपउपांत्यपूर्व लढत मारिया साकेरीची होणार आहे. बल्गेरियाच्या बिगरमानांकित त्स्वेताना पिरोन्कोव्हाने दुसरा धक्कादायक निकाल देताना 18 व्या मानांकित डोना व्हेकिकला सरळ सेट्सनी हरविले. याआधी तिने मुगुरुझाचा पराभव केला होता. अन्य लढतीत व्हिक्टोरिया अझारेन्काने इगा स्वायटेकचा 6-4, 6-2, सोफिया केनिनने ऑन्स जेबॉरचा 7-6 (7-4), 6-3, मारिया साकेरीने अमांदा ऍनिसिमोव्हाचा 6-3, 6-1 असा पराभव करून चौथी फेरी गाठली.

पुरुष एकेरीत दुसऱया मानांकित डॉमिनिक थिएमने 2014 चा विजेता मारिन सिलिकचे आव्हान चार सेटमध्ये संपुष्टात आणले. दोन सेट थिएमने जिंकल्यानंतर सिलिकने तिसरा सेट जिंकला. पण चौथा सेट पुन्हा थिएमने जिंकून पुढील फेरी गाठली. अन्य सामन्यात डॅनील मेदवेदेव्हने तिसरी फेरी गाठताना जेजे वुल्फचा 6-3, 6-2, 6-3, व्हॅसेक पॉस्पिसिलने रॉबर्टो ऍगटचा 7-5, 2-6, 4-6, 6-3, 6-2, ऑस्ट्रेलियाच्या ऍलेक्स डी मिनॉरने 11 व्या मानांकित कॅरेन खचानोव्हचा 6-4, 0-6, 4-6, 6-3, 6-1 असा पराभव करून आगेकूच केली. याशिवाय इटलीचा मॅटेव बॅरेटिनी, आंद्रे रुबलेव्ह यांनीही विजय मिळविले.

Related Stories

स्पेनची मुगुरूझा उपांत्य फेरीत

Patil_p

नीरजकडून ऑलिम्पिक म्युझियमला सुवर्णविजेता भाला भेट

Patil_p

जेव्हा नेटवर्कसाठी आयसीसी पंचांना झाडावर चढावे लागते!

Patil_p

लेजेंड्स बुद्धिबळ स्पर्धा आजपासून

Patil_p

फ्रान्सचा फुटबॉलपटू बेन्झेमा विश्व फुटबॉल स्पर्धेतून बाहेर

Patil_p

नॉर्विच सिटीच्या मुख्य प्रशिक्षकपदी डीन स्मिथ

Patil_p
error: Content is protected !!