Tarun Bharat

सेलडीडविषयी आज बेळगाव येथे सुनावणी

वार्ताहर / निपाणी :

श्रीपेवाडी येथील निपाणी औद्योगिक वसाहतीतील भूखंड 3 पैसे चौरस फूट दरानेच सेलडीड व्हावेत, अशी मागणी कारखानदारांनी केली आहे. याविषयीचा ठरावही झाला आहे. पण कार्यवाहीकडे दुर्लक्ष केल्याने एक खिडकी अंतर्गत तक्रार करण्यात आली होती. याची सुनावणी शुक्रवारी जिल्हाधिकाऱयांच्या उपस्थितीत होणार आहे. या निकालाकडे सर्वच कारखानदारांचे लक्ष लागले आहे.

निपाणी औद्योगिक वसाहतीतील प्लॉट प्रति चौरस फूट 3 पैसे दराने सेलडीड व्हावेत, असे निर्देश शासनाने दिले आहेत. प्लॉट सेलडीड न झाल्याने सध्याच्या औद्योगिक मंदीत सर्वच कारखानदार अडचणीत आले आहेत. कर्ज व व्याजाचा डोंगर वाढल्याने काही कारखानदारांना तर संबंधित बँकांनी लिलावाच्या नोटिसा दिल्या आहेत. या सर्व समस्येतून बाहेर पडण्यासाठी व कारखान्यांची व्याप्ती वाढविण्यासाठी सेलडीड ही गरज असताना याकडे पदाधिकाऱयांनी दुर्लक्षच केले आहे.

गेल्या अनेक वर्षापासून ही समस्या असली तरी तीन-चार वर्षात याची दाहकता वाढली आहे. पंचवार्षिक निवडणुकीत प्रचाराचा मुख्य मुद्दा बनवत सभासदांनी सत्तांतर घडविण्याची किमया केली आहे. तरी देखील याकडे दुर्लक्ष होत आहे. यातून विद्यमान अध्यक्षांविरोधात अविश्वासही दाखल करण्यात आला आहे. विद्यमान उपाध्यक्षांसह आठ संचालकांनी अविश्वास दाखल केला असून सेलडीडचेच कारण यासाठी सांगितले आहे.

चिकोडी येथे दाखल करण्यात आलेल्या अविश्वासाच्या तक्रारीची दखल आजपर्यंत घेतली गेल्याचे दिसत नाही. यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे आवश्यक होते. पण याकरीता टाळाटाळ होत असल्याने संताप व्यक्त होत आहे. यातच जिल्हाधिकाऱयांच्या उपस्थितीत शुक्रवारी सुनावणी होणार असल्याने या निकालातून न्याय मिळेल, अशा अपेक्षा कारखानदारातून व्यक्त होत आहेत.

Related Stories

‘त्या’ साखर कारखान्यावर कारवाई करा !

Tousif Mujawar

सार्वजनिक वाचनालयातर्फे सावित्रीबाई फुले जयंती

Patil_p

एम. व्ही. हेरवाडकर स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश

Omkar B

चंदगड तालुक्मयातील ऊस वादळी पावसाने जमीनदोस्त

Patil_p

वळिवाने शहर परिसराला झोडपले

Patil_p

पहिल्या डोससाठी मुलांची झुंबड

Patil_p